मंदिरं उघडण्यासाठी भावना भडकवून उद्रेक करणे चुकीचे; वारकरी साहित्य परिषदेची भूमिका
मुंबई : “मंदिरं सुरु व्हावीत ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, त्यासाठी सर्वसामान्यांच्या भावना भडकावून उद्रेक करणे चुकीचे आहे” अशी भूमिका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (Vittal Patil) यांनी मांडली आहे. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मोठा राजकीय संघर्ष सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी ही भूमिका मांडली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. […]
मुंबई : “मंदिरं सुरु व्हावीत ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, त्यासाठी सर्वसामान्यांच्या भावना भडकावून उद्रेक करणे चुकीचे आहे” अशी भूमिका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (Vittal Patil) यांनी मांडली आहे. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मोठा राजकीय संघर्ष सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी ही भूमिका मांडली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. (provoking emotions for opening temples is wrong said Warkari Sahitya Parishad)
“राज्यात मंदिरं सुरु व्हावीत अशी सर्वांचीच इच्छा आहे. पण, मंदिरं उघडण्यावरुन राजकीय पक्षांनी वारकरी संप्रदायाच्या नावाने राजकारण करु नये.” असे विठ्ठल पाटील म्हणाले. तसेच, वारकरी सांप्रदायातील लोकांनीसुद्धा राजकीय लोकांसोबत जाऊन भडकाऊ वक्तव्य करणे टाळावे, असे आवाहन त्यांनी राज्यातील सर्व वारकऱ्यांना केले.
तसेच, राज्यात दारुची दुकानं आणि मंदिर यांची तुलना केली जात आहे. राज्यात दारुची दुकानं सुरु झाली; मग मंदिरं का सुरु केली जात नाहीत असा सवाल सरकारला विचारला जात आहे. त्यावरही बोलताना, मंदिरात लहान-थोर, महिला-पुरुष असे सगळेच आत्मशांतीसाठी येतात. पण दारु पिणारे मोजकेच आहेत. दारुचे दुकान आणि मंदिराची तुलना होऊ शकत नाही. असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या :
मोठी बातमी: दिवाळीत मुंबईतील दोन जैन मंदिरे उघडण्यास न्यायालयाची परवानगी
“आचार्य उद्धव ठाकरे मंदि PHOTO | दार उघड बये दार उघड! मंदिर प्रवेशासाठी तुळजापुरात आंदोलन!
रं कधी सुरु करणार?” प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल
(provoking emotions for opening temples is wrong said Warkari Sahitya Parishad)