Pulwama Attack: सलाम!! बुलडाण्याचे दोन वीर धारातीर्थी!
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन वीर धारातीर्थी पडले. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात मलकापूर येथील 49 वर्षीय संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रा येथील नितीन राठोड या दोन जवानांना वीरमरण आलं. संजय राजपूत हे 115 बटालियनचे होते. त्यांना 3 भाऊ आणि 1 […]
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन वीर धारातीर्थी पडले. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात मलकापूर येथील 49 वर्षीय संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रा येथील नितीन राठोड या दोन जवानांना वीरमरण आलं. संजय राजपूत हे 115 बटालियनचे होते. त्यांना 3 भाऊ आणि 1 बहीण आहे. यातील एका भावाचा अपघातात मृत्यू झाला होता. सध्या दोघे भाऊ आहेत. संजय यांना 12 वर्षीय जय आणि 11 वर्षांचा शुभम अशी 2 मुले आहेत. 8 मे 1973 रोजी जन्मलेले संजय राजपूत हे वयाच्या 23 व्या वर्षी भरती झाले होते. त्यांची सीआरपीएफमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली होती. मात्र त्यांनी पाच वर्षे वाढवून घेतली होती.
या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास 40 जवान शहीद झाले आहेत, तर 38 जवान जखमी आहेत. जखमी जवानांवर जम्मूतील बदामीबागच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान 92, 17, 54, 82, 61, 21, 98, 118, 76, 45, 3 आणि 176 या बटालीयनचे होते. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने (Jaish E Mohammed) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आदिल अहमद डार (Adil Ahmad Dar) नावाच्या दहशतवाद्याने हा आत्मघाती हल्ला केला. आदिल हा पुलावामातील काकापोरा भागात राहात होता.
नेमकं काय घडलं?
दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान असल्याची माहिती आहे.
पुलवामा हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध
या हल्ल्याविरोधात अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. जगभरातून या हल्ल्याचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत आहे. रशिया, भूतान, अमेरिका, अफगानिस्तान, ऑस्ट्रेलिया, इस्रायलसह जगभरातील अनेक देशांनी भारतीय जवानांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात आता एकत्र येण्याची वेळ आहे, दहशतवादाला जगात स्थान नाही, दहशतवाद पूर्णपणे संपायला हवा अशा तीव्र प्रतिक्रिया जगभरातून येत आहेत.
संबंधित बातम्या
Pulwama Attack : मास्टरमाईंड आदिल अहमद दार नेमका कोण?
गेल्या पाच वर्षातले आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले
Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचुप