Pulwama Attack : ‘उरी’ चित्रपटाच्या टीमकडून शहीदांना एक कोटी रुपयांची मदत
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहीदांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. पेमेंट बँक अॅप पेटीएमने घोषणा केली होती की, या अॅपच्या सहाय्याने सीआरपीएफ वेल्फेअर फंडच्या माध्यमातून सीआरपीएफच्या जवानांसाठी तुम्ही दान करु शकता. या व्यतिरीक्त बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले, तर रिलायन्स फाऊंडेशनने शहीदांच्या मुलांचा […]
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहीदांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. पेमेंट बँक अॅप पेटीएमने घोषणा केली होती की, या अॅपच्या सहाय्याने सीआरपीएफ वेल्फेअर फंडच्या माध्यमातून सीआरपीएफच्या जवानांसाठी तुम्ही दान करु शकता. या व्यतिरीक्त बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले, तर रिलायन्स फाऊंडेशनने शहीदांच्या मुलांचा सर्व शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये आता उरी चित्रपटाच्या टीमनेही शहीद जवानांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये मदत करणार असल्याची घोषणा केली.
उरी चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनी ट्वीट करत माहिती दिली की, उरी चित्रपटाची टीम आर्मी वेल्फेअर फंडला एक कोटींची मदत देत आहे. आम्ही केलेली मदत ही पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मिळावी. आम्ही इतरांनाही विनंती करतो की, त्यांनी सुद्धा अशा कठीण परिस्थितीत जवानांना साथ द्यावी.
RSVP &Team URI committed Rs. 1 Cr to families of URI attack /Army Welfare Fund -will ensure part goes to victims #Pulwama ..but urge more to respond -in small lots – and also our Indian “Unicorns” to donate graciously @Paytm @Olacabs @Flipkart @amazon @narendramodi @anandmahindra
— Ronnie Screwvala (@RonnieScrewvala) February 16, 2019
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकरांनी राग व्यक्त केला आहे. तसेच या घटनेचा निषेध करत त्यांनी काळा दिवसही पाळला. या हल्ल्यावर काही कलाकारांनी सरकाराला लवकरात लवकर पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
पुलवामा हल्ल्यानंतर उरी चित्रपटातील मुख्य भूमिका साकरणारा अभिनेता विकी कौशलनेही शहीदांना श्रद्धांजली वाहिली. दहशतवादी हल्ल्याची बातमी समजताच मी खुप दु:खी आहे. सीआरपीएफच्या त्या बहाद्दूर जवानांसाठी माझे ह्रदय दाटून आले आहे. जे जवान जखमी आहेत ते लवकरच ठिक होऊ देत, अशी प्रार्थना मी करतो, असं विकी कौशल याने सोशल मीडियावर सांगितले. तर चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनीही या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर कठोर कारवाई करत उत्तर दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.
व्हिडीओ : शहीद संजय राजपूत यांना अखेरचा सलाम !