पुणे : लाखो वारकऱ्यांचे दैवत असलेले (Alandi Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi) आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाबाबत आज निर्णय घेण्यात आला. पालखी सोहळ्याची परंपरा अखंडित ठेवण्यावर आळंदी देवस्थानची सर्व विश्वस्त माऊली अश्वाचे मानकरी शितोळे सरकार चोपदार हैबतबाबाचे वंशज बाळासाहेब आरफळकर आणि इतर प्रमुख पंधरा सदस्यांचे एकमत (Alandi Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi) झाले आहे.
लाखो वारकऱ्यांचे दैवत असलेले आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान करायचे की नाही, याबाबत आज आळंदी देवस्थानची सर्व विश्वस्त माऊली अश्वाचे मानकरी शितोळे सरकार चोपदार हैबतबाबा चे वंशज बाळासाहेब आरफळकर हे आणि इतर प्रमुख असे पंधरा सदस्य यांच्यामध्ये आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची परंपरा अखंडित ठेवण्यावर आजच्या बैठकीत एकमत झालं. मात्र, ही परंपरा अखंडित ठेवताना समाज आणि वारकऱ्यांचे आरोग्य आणि हित विचारात घेतलं जाईल, असाही निर्णय घेण्यात आला.
VIDEO : Lockdown Effect | कोल्हापुरातील अंबाबाई देवस्थान समितीला लॉकडाऊनचा फटका https://t.co/9tlByKzzLl
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 6, 2020
येत्या 13 जूनला पालखी सोहळा सुरु होतो आहे. त्यावेळी कोरोनाची परिस्थिती कशी असेल, हे पाहूनच अंतिम निर्णय घेण्याचा या बैठकीत ठरवण्यात आलं. याबाबत सरकारशी ही चर्चा केली जाईल. त्यानंतर पालखी सोहळ्याबाबत (Alandi Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi) जे ठरलंय, त्यांचं वारकरी संप्रदायाने पालन करावं, असं आवाहन आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी केलं आहे. तसेच, इतर सात पालखी संस्थानांशी देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा केली जाणार आहे.
महाराष्ट्रभरातून मानाच्या सात पालख्यांसह छोट्या-मोठ्या शंभर ते दीडशे पालख्या आणि अंदाजे पंधरा ते वीस लाख वारकरी हे मजल दरमजल करत आषाढी वारीला पंढरपूरला जात असतात. मात्र, या वर्षी पंढरपूर वारीवर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे दोनवेळा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे जून महिन्यातील कोरोनाची राज्यातील स्थिती पाहून आळंदी पालखी सोहळ्यावर (Alandi Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi) निर्णय घेण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईचं कुटुंब गावात अडकलं, कुटुंबाने लॉकडाऊन सार्थकी लावला, 20 दिवसात विहीर खोदली
पोलीस मामाच्या भूमिकेत, लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमेवरच शुभमंगल
एका दिवसात तब्बल 38 पोलिसांना कोरोना, राज्यातील 495 पोलीस कोरोनाग्रस्त
लॉकडाऊनमुळे 10 बाय 10 च्या घरात लग्न, पोलीस वऱ्हाडी, 5-6 जणांची हजेरी