पुण्यात तीन दिवसात ‘कोरोना’चे 298 नवीन रुग्ण, भवानी पेठेत दोनशेपार, कोणत्या प्रभागात किती?

भवानी पेठेतील रुग्णसंख्या एका दिवसात 19 ने वाढली आहे. इथे आता 214 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. Pune Bhawani Peth Corona Patients Update

पुण्यात तीन दिवसात 'कोरोना'चे 298 नवीन रुग्ण, भवानी पेठेत दोनशेपार, कोणत्या प्रभागात किती?
Follow us
| Updated on: Apr 26, 2020 | 4:10 PM

पुणे : पुण्यात ‘कोरोना’चे काल 90 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 70 वर गेली आहे. कालच्या दिवसात पुण्यात कोरोनामुळे पाच बळी गेले असून आतापर्यंत 69 जणांना प्राण गमवावे लागले. भवानी पेठेतील रुग्णसंख्या दोनशेच्या पार गेली आहे. (Pune Bhawani Peth Corona Patients Update)

गेल्या तीन दिवसात पुण्यात ‘कोरोना’चे 298 नवीन रुग्ण आढळले आहेत. पुण्यात 842 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत, तर 159 रुग्ण बरे झाले आहेत. पुणे शहरात 25 एप्रिलपर्यंत 1075 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णांपैकी 1037 रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

हेही वाचा : मुंबई पोलीस दलातील आणखी एका हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू

भवानी पेठेतील रुग्णसंख्या एका दिवसात 19 ने वाढली आहे. इथे आता 214 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. एकूण चार वॉर्डमध्ये रुग्णसंख्या शंभरीपार गेली आहे.

ढोले पाटील रोड (26 नवे रुग्ण), शिवाजीनगर-घोलेरोड (23), भवानी पेठ (19), वानवडी – रामटेकडी (10) या भागात एका दिवसात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र औंध – बाणेर, कोथरुड – बावधन, वारजे – कर्वेनगर, सिंहगड रोड इथे एकही नवा रुग्ण सापडला नाही. तर कोंढवा – येवलेवाडी आणि बिबवेवाडीतही प्रत्येकी एकच नवा रुग्ण सापडणं दिलासादायक बाब आहे.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ) 

औंध – बाणेर – 3 (0) कोथरुड – बावधन –  1 (0) वारजे – कर्वेनगर – 9 (0) सिंहगड रोड –  10 (0) शिवाजीनगर – घोलेरोड – 133 (+23) कसबा – विश्रामबाग वाडा – 127 (+3) धनकवडी – सहकारनगर –  55 (+6) भवानी पेठ – 214  (+19) (Pune Bhawani Peth Corona Patients Update) बिबवेवाडी – 31 (+1) ढोले पाटील रोड –  160 (+26) कोंढवा – येवलेवाडी – 13 (+1) येरवडा – धानोरी – 110 (+6) नगर रोड – वडगाव शेरी –  29 (+3) वानवडी – रामटेकडी – 54 (+10) हडपसर – मुंढवा –  30 (+2) पुण्याबाहेरील – 49 (+5)

(Pune Bhawani Peth Corona Patients Update)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.