लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचा गळा चिरला, खून करुन तरुणी स्वत: पुणे पोलिसात हजर
प्रेयसीने प्रियकराची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune boyfriend Murder ) घडली आहे.
पुणे : प्रेयसीने प्रियकराची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune boyfriend Murder ) घडली आहे. प्रियकर लग्न करत नसल्याच्या कारणावरुन हे थरारक हत्याकांड पुण्याजवळच्या नऱ्हे गावात घडलं. प्रेयसीने कोयत्याने गळा कापून प्रियकराचा खून केला. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune boyfriend Murder)
प्रियकराची हत्या करुन आरोपी तरुणी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाली. महंतेश बिरादार (27 वर्षे) मूळ रा. संख, ता.जत, जि.सांगली असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. तर अनुराधा करे ( वय 24 वर्षे) सध्या रा. नऱ्हे, मूळ गाव करेवाडी, ता.जात जि.सांगली असे खून करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.
या धक्कादायक प्रकाराने परिसर हादरुन गेला आहे. तरुणीने तरुणाचा खून केल्याने, परिसरात याच घटनेची चर्चा आहे.
यापूर्वी लग्नास नकार दिल्याने अनेक हत्याकांड झाल्याच्या किंवा आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक प्रकरणांमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचं उघड झालं आहे. मात्र नऱ्हे गावातील घटनेत 24 वर्षीय आरोपी तरुणीने 27 वर्षीय प्रियकराची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरु आहे.
संबंधित बातम्या
प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी विद्यार्थिनी प्रियकरासोबत पसार
सूनेचे विवाहबाह्य संबंध, आमदार विद्या चव्हाण यांचे गंभीर आरोप