पुणे : पुण्यात ‘कोरोना’मुळे उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुणे शहरातील दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रतिबंधित भागात अतिरिक्त मनाई आदेश लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Pune City Corona Curfew)
समर्थ नगर, खडक, स्वारगेटसह दहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत या अगोदर प्रतिबंधित करण्यात आलेल्या भागांचा समावेश आहे. 3 मे मध्यरात्री 12 वाजेपर्यंतसाठी संपूर्ण मनाई आदेश काढण्यात आले आहेत. या काळात सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत दूध विक्रीस परवानगी देण्यात आलेली आहे. औषध आणि दूध विक्री वगळता सर्व प्रकारच्या विक्रीवर मनाई आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील किराणा माल, भाजीपाला आणि फळं, चिकन, मटण, अंडी विक्री दुकानं आणि इतर वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर शासकीय अन्नधान्य वितरण कार्यालय यांच्याकडून चालू असलेल्या कार्यवाहीसाठी हे निर्बंध लागू नसतील.
कोणकोणत्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीचा समावेश?
1) समर्थ नगर
2) खडक
3) फरसखाना पोलीस स्टेशनचे सर्व कार्यक्षेत्र
4) स्वारगेट
5) लष्कर
(Pune City Corona Curfew)
6) बंडगार्डन
7) सहकारनगर
8) दत्तवाडी
9) येरवडा
10) खडकी
पुणे शहर आणि जिल्ह्यातील ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आणि मृतांच्या आकड्यात वाढ कायम आहे. पुणे जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 105 नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले. आता जिल्ह्यातील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांचा आकडा 1700 वर गेला आहे. दिवसभरात जिल्ह्यात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 92 वर गेला आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सात कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. पुणे शहराच्या हद्दीत चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर तीन मृत्यू हे पुण्याबाहेरील आहेत. इंदापूर, कोल्हापूर आणि खडकीच्या रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
पुणे शहरात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 85 वर गेला आहे. तर पुण्यात नवीन 86 रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्या आता 1518 इतकी आहे.
VIDEO : Special Report | ‘3 मे’ नंतरही पुण्यात अतिरिक्त निर्बध! कोरोना रुग्णांचा आकडा 1500 च्या घरातhttps://t.co/oRA1e370KH
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 30, 2020