प्रत्येक वॉर्डमध्ये कोव्हिड दक्षता समिती, क्वारंटाईनसाठी हॉटेल, पुण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा अॅक्शन प्लॅन
केंद्रीय पथक आणि इतर बैठकांमध्ये विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप भाजपने केला. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना विश्वासात घेण्याचे आश्वासन दिले.
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यातील विभागीय आयुक्तालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यात जम्बो रुग्णालय कुठे उभारले जाणार, कुठे किती प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली. (Pune CM Uddhav Thackeray Corona Review Meeting)
“प्रत्येक वॉर्डमध्ये कोव्हिड दक्षता समिती स्थापन करावी, केंद्राकडून काही वैद्यकीय सवलत सप्टेंबरपासून बंद होणार आहे, ती पुन्हा मिळत राहावी यासाठी प्रयत्न सुरु आहे” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. लॉकडाऊन हा पर्याय नाही, नागरिकांनी नियम पाळले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार गिरीश बापट, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यासारखे लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
“सर्व महापालिका आणि वैद्यकीय पथकाची समस्या सोडवू, लक्षणे असलेल्या रुग्णांना घरी क्वारंटाईन करणं सध्या आपल्याकडे अवघड आहे. यासाठी हॉटेल उपलब्ध करुन देण्याची गरज आहे, आवश्यक असलेले औषध मार्गदर्शक सूचनांनुसार मिळेल” अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळी भाजपच्या वतीने “आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही” असा आक्षेप घेतला. केंद्रीय पथक आणि इतर बैठकांमध्ये विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप भाजपने केला. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना विश्वासात घेण्याचे आश्वासन दिले.
बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
पुणे : विभागीय आयुक्तालयात लोकप्रतिनिधींसोबत आयोजित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आढावा बैठक संपली, मुख्यमंत्री सर्किट हाऊसला रवाना https://t.co/JD5viVpgTV pic.twitter.com/kBYRLCAxDx
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2020
(Pune CM Uddhav Thackeray Corona Review Meeting)