पर्यटकांसाठी आकर्षण असलेला भुशी डॅम खुला, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश

लोणावळ्याजवळचा भुशी डॅम हा पिकनिक स्पॉट आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पर्यटकांसाठी आकर्षण असलेला भुशी डॅम खुला, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 12:01 AM

पुणे : कोरोना लॉकडाऊन (Corona Lockdown) या गोष्टी सर्वसामान्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या ठरल्या. घराबाहेर पडणं बंद झालं. घरात बसून राहणं जरी कंटाळवाणं असलं तरी लोकांकडे दुसरा पर्याय नव्हता. पीकनिक प्लॅन करावा तर कुठे? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण जरा थांबा… आता तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर एक उत्तम पर्याय तो भुशी डॅमचा… लोणावळ्याजवळचा हा पिकनिक स्पॉट आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. (Pune Collector Rajesh Deshmukh Order Bhushi Dam Open)

मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातील भुशी डॅम आणि परिसरातील इतर धरणं आता पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी बंदी घालण्यात आली होती ती उठवण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश दिले आहेत.

अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये आता सर्व गोष्टी आता हळूहळू पुर्ववत होत आहेत. अशात आता पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी खुली करण्यात येत आहेत. भुशी डॅम पुणे आणि मुंबई या दोन बड्या शहरांच्या मध्यावर आहे. त्यामुळे पावसाळ्यात या परिसरात नेहमी पर्यटकांची गर्दी असते. यंदाचा पावसाळा पर्यटनाविना गेला. आता मात्र हा परिसर पर्यटकांसाठी खुला झाला आहे.

धकाधकीच्या जीवनात आठवडाभर काम केल्यानंतर भुमी डॅमसारखं ठिकाण या थकवा दूर करणारं ठरतं. पर्यटकांसाठी हा चांगला पर्याय आहे. पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या इतर छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यावर लॉकडाऊनच्या काळात मोठा परिणाम झाला. आता मात्र त्यांनाही या निर्णयामुळे हातभार लागेल.

नागरिकांसाठी आता लोणावळा आणि आसपासचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. मात्र कोरानाचं संकट अजूनही संपलेलं नाहीये. त्यामुळे काही नियम पाळतच पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

(Pune Collector Rajesh Deshmukh Order Bhushi Dam Open )

संबंधित बातम्या

…तर अनलॉकचा विचार सोडून द्यावा लागेल; राजेश टोपे यांचा इशारा

Maharashtra Unlock | येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार? राजेश टोपेंचे संकेत

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.