Pune corona case | पुण्याच्या दाम्पत्याला कोरोनाची लागण, दोघेही पॉझिटिव्ह : आरोग्य मंत्री
पुण्यातील मेट्रो सिटी, जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षात वाढ केली आहे," अशीही माहिती राजेश टोपे यांनी (Health minister on Pune corona case) दिली.
पुणे : जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरु असतानाही महाराष्ट्रातही कोरोनाने शिरकाव (Health minister on Pune corona case) केला आहे. परदेशातून पुण्यात आलेल्या त्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे नुकतंच स्पष्ट झालं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना याबाबतची माहिती दिली. यामुळे पुणेकरांसह राज्यात भीतीचे वातावरण पसरलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या (Health minister on Pune corona case) माहितीनुसार, “कोरोनाग्रस्त दाम्पत्य हे 1 मार्चला पुणे विमानतळावर दाखल झाले. या दाम्पत्याचे थर्मल स्कॅनिंग झालं होत. मात्र त्यावेळी ते डिटेक्ट झालेले नाही. त्यानंतर 6 मार्चपर्यंत हे दाम्पत्य त्यांच्या घरी होते. मात्र त्यानंतर काही लक्षणं दिसू लागल्यामुळे पुण्यातील संबंधित महिलेने दवाखान्यात दाखवलं. त्या परदेशाहून आल्या होत्या. कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळे त्यांच्यावर चाचणी केली. त्या चाचणीत हे दाम्पत्य पॉझिटिव्ह आढळलं आहे. त्यांना नायडू रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये (विलगीकरण कक्ष) ठेवलं आहे.”
मटणाचा भाव चिकनच्या दसपट, खवय्यांची मात्र बोकडालाच पसंती
“महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी होणार आहे. त्या दुबईला ज्या 40 जणांच्या ग्रुपमध्ये गेल्या होत्या. ते प्रवासी, विमानातील सहप्रवासी, टॅक्सीचालक, शेजारी, नातेवाईक, योगा क्लासमधील व्यक्ती, ऑफिसमधील सहकारी अशा सर्वांचे संपर्क आम्ही मिळवले आहेत. त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (Contact Tresing) सुरु आहे. यांची सर्वांची तपासणी सुरु आहे. पण यातील कोणाचीही नावं उघड करणार नाहीत,” असेही राजेश टोपे म्हणाले.
“केंद्राच्या प्रशिक्षित डॉक्टरांच्या निगराणीखाली महिलेला ठेवण्यात आलं आहे. ट्रिपल लेअर मास्क वापरले जात आहे. महिलेला पुढील 14 दिवस निगराणीखाली ठेवण्यात येईल. कोणीही भयभीत होण्याचं कारण नाही. केरळमध्येही तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, मात्र त्यांच्यावर उपचारानंतर प्रतिकारक्षमता वाढवण्यात यश आलं होतं. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. जरी पॉझिटिव्ह व्यक्ती आढळला तरी तो बरा होतो. कोरोना 80 टक्के सौम्य स्वरुपाचा आहे. त्यानंतर 10 ते 15 टक्के गंभीर, तर 5 टक्के अतिगंभीर स्वरुपाचा असतो. यामध्ये 2 ते 5 टक्के मृत्यूदर आहे,” असेही आरोग्यमंत्री म्हणाले.
“सर्वांनी काळजी घ्या, होळीला गर्दी करुन नका. चिकन-मटण खाऊ नये अशा ज्या अफवा पसरल्या आहेत. त्या धादांत खोट्या आहेत. चिकन मटण न खाल्ल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. तुम्हाला जे काही खायचं आहे ते व्यवस्थित शिजवून खाल्ल पाहिजे. विशिष्ट उच्च तापमानावर कोरोनाचे विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. कोरोना व्हायरसचा इन्क्यूबेशन पिरेड हा किमान 14 दिवसांपासून 28 दिवसांपर्यत इनक्यूबेशन असतो,” असेही ते (Health minister on Pune corona case) म्हणाले.
“सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी हे भारतीयांसाठी नियमित आजार आहेत. त्याचा अर्थ कोरोना झाला, असा गैरसमज करुन घेऊ नये. हा आजार हवेतून संसर्ग होत नाही. एखाद्या व्यक्तीच्या खोकण्यातून किंवा शिंकण्याद्वारे कोरोनाचे विषाणू पसरतात. त्यामुळे एक मीटरपर्यंत सुरक्षित अंतर ठेवावे,” असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
Pune corona case | दाम्पत्याला कोरोना, एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, पुण्यात 200 खाटांचे रुग्णालय सज्ज
“यासाठी कोणतेही ठराविक मास्क किंवा सॅनिटाझर वापरण्याची आवश्यकता नाही. हे सर्व भीतीमुळे होतं आहे. याबाबत जनजागृती सुरु आहे. पुण्यातील डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द केल्या असून सर्वांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यातील मेट्रो सिटी, जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षात वाढ केली आहे,” अशीही माहिती राजेश टोपे यांनी (Health minister on Pune corona case) दिली.
पाहा व्हिडीओ :