पुण्यात कोरोना बळींची संख्या 47 वर, आणखी दोघांचा मृत्यू
पुणे शहरात 45 जणांचा कोरोनाबळी गेला आहे. तर पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला (Pune Corona Dead) आहे.
पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली (Pune Corona Dead) आहे. आज (17 एप्रिल) पुणे जिल्ह्यात संध्याकाळी पाच पर्यंत 531 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आज दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुण्यातील कोरोनाबळींची संख्या 47 वर पोहोचली आहे.
पुण्यात आज (17 एप्रिल) सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाचपर्यंत 22 नवे रुग्ण (Pune Corona Dead) आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 531 पर्यंत पोहोचली आहे.
यातील 446 रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. तर 49 रुग्ण हे पिंपरी चिंचवड आणि 36 रुग्ण हे पुणे ग्रामीण भागातील आहेत. तर दुसरीकडे पुणे शहरात 45 जणांचा कोरोनाबळी गेला आहे. तर पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान पुण्यातील भवानी पेठेत कालच्या दिवसात तब्बल 22 नवे रुग्ण सापडले आहेत. भवानी पेठ परिसरात सातत्याने कोरोना रुग्ण आढळत असल्याने इथली रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. आतापर्यंत इथे 118 रुग्ण सापडले असून 15 रहिवाशांचा ‘कोरोना’मुळे बळी गेला आहे.
आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील हवेली, शिरुर, बारामती, भोर, वेल्हे, मुळशी आणि जुन्नर या सात तालुक्यात कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर उर्वरित इंदापूर, मावळ, दौंड, खेड, पुरंदर आणि आंबेगाव या सहा तालुक्यात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. भोर आणि पुरंदर या दोन तालुक्यात ‘बारामती पॅटर्न’ राबवायला सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर अद्यापही सर्वाधिक आहे. राज्यातील मृत्यूदर 6.41 टक्के आहे, परंतु पुण्यातील ‘कोरोना’ग्रस्तांचा मृत्यूदर दहा टक्क्यांच्या आसपास आहे. राज्यातील सर्वाधिक ‘कोरोना’बळी मुंबईत गेले असले, तरी रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक मृत्यू पुण्यात आहेत. रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहिल्यानंतर राज्यात सर्वाधिक म्हणजे 9.3 टक्के मृत्यूदर पुण्यात असल्याचं दिसून येतं.
ससून रुग्णालयात पुण्यातील सर्वाधिक म्हणजे 38 जणांचे मृत्यू झाले आहेत. अनेक कोरोनाबाधित रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, इतर आजार किंवा शस्त्रक्रिया झाल्याचे पाहायला मिळाले (Pune Corona Dead) आहे.