Pune Corona | पुण्याचा मृत्यूदर काही केल्या घटेना, देशात सर्वाधिक मृत्यूदर पुण्यात

गेल्या महिनाभरापासून सातत्याने पुण्याचा मृत्यूदर सर्वाधिक असल्यानं पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

Pune Corona | पुण्याचा मृत्यूदर काही केल्या घटेना, देशात सर्वाधिक मृत्यूदर पुण्यात
Follow us
| Updated on: May 02, 2020 | 7:42 PM

पुणे : पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या (Pune Corona Death Rate Update) आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण काही केल्याने कमी होताना दिसत नाही. त्यातच, रुग्ण आणि मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. 30 एप्रिलपर्यंत पुण्याचा मृत्यूदर राज्यातच नाही, तर देशात सर्वाधिक असल्याचं आढळून आलं आहे. देशाच्या मृत्यूदरापेक्षा पुण्याचा मृत्यूदर तब्बल 2.3 टक्‍क्‍यांनी जास्त आहे. गेल्या (Pune Corona Death Rate Update) महिनाभरापासून सातत्याने पुण्याचा मृत्यूदर सर्वाधिक असल्यानं पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,828 असून मृतांच्या संख्येने शतक गाठलं आहे. त्यापैकी 93 मृत हे एकट्या पुणे शहरातील आहेत. दुसरीकडे पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 1611 इतकी झाली आहे. मृतांची संख्या वाढल्याने पुण्याचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे.

पुण्याचा मृत्यूदर किती?

पुण्याचा मृत्यूदर 30 एप्रिलपर्यंत 5.6 टक्के होता. तर महाराष्ट्राचा मृत्यूदर 4.4 टक्के आणि देशाचा मृत्यूदर 3.3 टक्के होता. म्हणजेच देशाच्या मृत्यूदरापेक्षा पुण्याचा मृत्यूदर जास्त आहे. पुण्याचा मृत्यूदर राज्यासह देशात सर्वाधिक आहे. आकडेवारीनुसार, देशाच्या मृत्यूदरापेक्षा (Pune Corona Death Rate Update) पुण्याचा मृत्यूदर तब्बल 2.3 टक्‍क्‍यांनी जास्त आहे.

भारतात आतापर्यंत एकूण रुग्ण 33 हजार 50 कोरोना रुग्ण असून त्यापैकी 1,074 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात 9 हजार 915 कोरोनाचे रुग्ण असून 432 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात एकूण 1,518 कोरोनाचे रुग्ण असून आतापर्यंत 85 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 11 हजारांच्या पार 

महाराष्ट्रात 1 मे रोजी एकाच दिवसात 1 हजार 8 कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 11 हजार 506 झाली. या व्यतिरिक्त आज दिवसभरात 106 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 1 हजार 879 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाच्या एकूण 9 हजार 148 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Pune Corona Death Rate Update

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

मिरा भाईंदरमध्ये 3 वर्षांच्या चिमुरडीसह एकाच दिवसात 56 रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक प्रशासनाने करुन दाखवलं, मजुरांना घेऊन दोन ट्रेन रवाना, एका डब्ब्यात 54 प्रवासी

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1828 वर, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?

पुण्यात कोरोनाबळींचा आकडा 100 वर, एका पुरुषाचा मृत्यू

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.