Pune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला

| Updated on: Aug 08, 2020 | 12:27 AM

पुण्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 32.51 दिवसांवर म्हणजे जवळपास 33 दिवसांवर गेला आहे.

Pune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला
Follow us on

पुणे : कोरोनाने त्रस्त झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे (Pune Corona Patient Double Rate). पुण्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 32.51 दिवसांवर म्हणजे जवळपास 33 दिवसांवर गेला आहे. तर मृत्यूदर 2.35 टक्‍क्‍यांवर घसरला आहे. 29 जुलै रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 24.57 दिवसांवर होता. तर मृत्यूचा दर 2. 42 होता. तर 29 जून रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 17. 66 दिवसांवर होता. 6 ऑगस्टच्या मनपाच्या आकडेवारीनुसार रुग्ण डबल होण्याचा कालावधी वाढून 33 दिवसांवर आला आहे (Pune Corona Patient Double Rate).

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

पुणे मनपा हद्दीत गुरुवारपर्यंत तब्बल 62 हजार 37 कोरोना बाधित रुग्ण होते. 43 हजार 606 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत 1456 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 674 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून 249 रुग्ण गंभाीर आहेत.

पुण्यात कोरोना अटकाव करण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात नुकतेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठकही पार पडली. शहरात सर्वाधिक रोज साधारण पाच ते सहा हजार टेस्ट केल्या जात आहे त्याचबरोबर ट्रेसींगवर भर देण्यात आला (Pune Corona Patient Double Rate).

तर मृत्यूदर कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांवर, कोमॉर्बीड रुग्णांवर उपचार करण्यास भर देण्यात आलाय. त्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणि मृत्यूचा दर कमी होत असल्याचे दिसते.

सुरुवातीला पुण्यात कोरोनाचा मृत्यूदर हा देशात सर्वाधिक होता. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही फार कमी होता. पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत होती. मात्र, प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात थोडंफार यश आलं आहे.

Pune Corona Patient Double Rate

संबंधित बातम्या :

“कामगार कुठले आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या भागातले?” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा

Pune | पुणेकरांनो, हॉटेल-मॉलमध्ये जाताय? हे नियम वाचून घ्या