Pune Corona | पुणेकरांसाठी गुड न्यूज! कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला, तर मृत्यूदर घसरला
पुणे खुलं केल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आहे, असा दावा आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला आहे.
पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या (Pune Corona Patients Increase Rate) प्रमाणात वाढला आहे. मात्र, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढवण्यात आणि मृत्यूदर कमी करण्यात पालिका प्रशासनाला यश आलं आहे. त्यामुळे पुणे खुलं केल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आहे, असा दावा आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला आहे. जून अखेर अॅक्टिव्ह रुग्ण 6 हजारांवर जाणार असल्याचं आयुक्तांनी (Pune Corona Patients Increase Rate) सांगितलं आहे.
पुण्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 9.6 टक्क्यांवरुन 4.66 टक्क्यांवर घसरला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 19 दिवसांवर गेला आहे. पूर्वीच्या अंदाजाच्या तुलनेत सध्या अत्यंत कमी 2,500 बाधित रुग्ण असल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे.
त्याचबरोबर दर 15 दिवसांनी प्रतिबंधित क्षेत्राची पुनर्रचना केली जाणार आहे. सध्या 66 प्रतिबंधित झोन असून काही भागात रुग्ण आढळल्यास तो वाढेल आणि बरं झाल्यास तो भाग कमी होईल. यासंदर्भात सोमवारी प्रतिबंधित क्षेत्रांची पुनर्रचना होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितलं.
तर नव्वद दिवसापासून प्रतिबंधित भागातील नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी आणखी छोटे क्लस्टर निर्माण करण्याचा विचार आहे. घरं, छोटा गल्ल्या कॉलनीनुसार प्रतिबंधित क्षेत्र करण्याचा विचार आहे, असंही आयुक्तांनी सांगितलं (Pune Corona Patients Increase Rate).
Pune Corona Recovery | सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या पुणे विभागाचा रुग्ण बरे होण्याचा दर 62.15 टक्क्यांवरhttps://t.co/GznmlXxYlV#PuneFightsCorona #punelockdown #CoronaInMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 13, 2020
संबंधित बातम्या :
कानून के हाथ लंबे होते है | तडीपार आरोपींवर नजर ठेवण्यासाठी पुणे पोलिसांचा हायटेक फंडा
Pune Corona : पुण्यात एकाच दिवसात 14 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू