Pune Corona Recovery | पुणे विभागात आतापर्यंत 10 हजार 156 रुग्ण कोरोनामुक्त
पुणे विभागात सर्वाधिक जास्त प्रादुर्भाव पुणे जिल्ह्यात झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या 12 हजार 389 कोरोनाबाधित रुग्ण असून 7 हजार 922 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.
पुणे : पुणे विभागात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांनी 10 हजारांचा (Pune Corona Recovery Rate) टप्पा ओलांडला आहे. पुणे विभागात आतापर्यंत 10 हजार 156 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. पुणे विभागात सध्या 15 हजार 893 रुग्ण असून ॲक्टिव्ह रुग्ण 5 हजार 21 आहेत (Pune Corona Recovery Rate).
पुणे विभागात आतापर्यंत 716 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 254 रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पुणे विभागात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 63.90 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.51 टक्क्यांवर आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली.
पुण्यात 12,389 कोरोनाबाधित, 515 जणांचा मृत्यू
पुणे विभागात सर्वाधिक जास्त प्रादुर्भाव पुणे जिल्ह्यात झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या 12 हजार 389 कोरोनाबाधित रुग्ण असून 7 हजार 922 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण 3 हजार 952 असून 515 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 254 रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 63.94 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.16 टक्के इतके आहे.
साताऱ्यात 745 कोरोना रुग्ण
सातारा जिल्ह्यात 745 कोरोनाबाधि रुग्ण असून 537 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 174 असून 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे (Pune Corona Recovery Rate).
सोलापुरात 1,787 कोरोना रुग्ण, 942 रुग्ण कोरोनामुक्त
सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 787 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत 942 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. सोलापुरात सध्या ॲक्टिव्ह रुग्ण 693 असून 152 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगलीत 247 कोरोना रुग्ण
सांगली जिल्ह्यात 247 कोरोना रुग्ण आहे. तर आतापर्यंत 121 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या ॲक्टिव्ह रुग्ण 119 असून 7 रुग्णांचा मृत्यू झालाय आहे.
कोल्हापुरात 725 कोरोना रुग्ण, 8 जणांचा मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यात 725 कोरोनाबाधित आहेत. तर आतापर्यंत 634 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोल्हापुरात कोरोनाचे 83 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
VIDEO : Pune Corona Recovery | पुणे विभागातील 10 हजार 156 रुग्ण कोरोनामुक्तhttps://t.co/YBlrxVteyH
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2020
Pune Corona Recovery Rate
संबंधित बातम्या :
पुण्यातील सर्व उद्यानं बंद होणार, महापौरांच्या पालिका प्रशासनाला सूचना
Maharashtra Police | मुंबईत तीन तर पुण्यात एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू
Pune | पुण्यात परप्रांतीय प्रवाशी, मजुरांचा ओघ, 15 दिवसात 13 हजार परप्रांतीय दाखल