Pune Corona Update | पुणे विभागात 10 हजार रुग्ण कोरोनामुक्त, मृत्यूदर 4.51 टक्क्यांवर

पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 893 तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 5 हजार 21 इतकी आहे.

Pune Corona Update | पुणे विभागात 10 हजार रुग्ण कोरोनामुक्त, मृत्यूदर 4.51 टक्क्यांवर
Follow us
| Updated on: Jun 18, 2020 | 7:09 PM

पुणे : पुणे विभागातील आतापर्यंत 10 हजार 156 कोरोनाबाधित (Pune Corona Recovery Update) रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 893 तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 5 हजार 21 इतकी आहे. पुणे विभागात आतापर्यंत कोरोनाबाधित 716 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 254 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत (Pune Corona Recovery Update).

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 63.90 टक्के आहे. तर, कोरोना मृत्यू दर 4.51 टक्के आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 12,389 रुग्ण

पुणे जिल्ह्यात सध्या 12  हजार 389  कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 7  हजार 922 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3 हजार 952 आहे. कोरोनाबाधित एकूण 515 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 254 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 63.94 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.16 टक्के इतके आहे. कालच्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 330 ने वाढ झाली आहे.

यामध्ये पुणे जिल्ह्यात 242, सातारा जिल्ह्यात 7, सोलापूर जिल्ह्यात 65, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे (Pune Corona Recovery Update).

साताऱ्यात कोरोनाचे 745 रुग्ण

सातारा जिल्ह्यातील 745 कोरोनाबाधित रुग्ण असून 537 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण 174 संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या 1,787 वर

सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 787 कोरोनाबाधित रुग्ण असून 942 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 693 आहे. कोरोनाबाधित एकूण 152 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगलीत कोरोनाबाधितांचा आकडा 247 वर

सांगली जिल्ह्यातील  कोरोनाबाधित 247 रुग्ण असून 121 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 119 संख्या  आहे. कोरोना बाधित एकूण 7  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापुरात कोरोनाचे 725 रुग्ण

कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत 725 रुग्ण असून 634 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 83 आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पुणे विभागात एकूण 1 लाख 21 हजार 4 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 17 हजार 379 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 625 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 1 हजार 228 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 15 हजार 893 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे (Pune Corona Recovery Update).

संबंधित बातम्या :

PMPML बस सेवा सुरु करा, पुणे महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव

Corona Update | नवी मुंबईत दिवसभरात 128 नवे कोरोनाबाधित, बाधितांचा आकडा 4 हजार 189 वर

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट थेट बीएमसीकडे का? मनसेचा सवाल, रुग्णाला रिपोर्ट कळवण्याची मागणी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.