Pune Corona | पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 3556 जणांचा कोरोनाने मृत्यू, वाढत्या मृत्यूदराने प्रशासनाची चिंता वाढवली

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 29 हजार 596 इतकी असून अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 27 हजार 383 इतकी आहे.

Pune Corona | पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 3556 जणांचा कोरोनाने मृत्यू, वाढत्या मृत्यूदराने प्रशासनाची चिंता वाढवली
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 4:53 PM

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वेगानं होत आहे (Pune Corona Virus Death Rate). एकीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे (Pune Corona Virus Death Rate).

8 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर आज पुणे शहरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 84 हजार 496 इतकी झाली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 14 हजार 686 इतकी आहे. आतापर्यंत 2 हजार 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 29 हजार 596 इतकी असून अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 27 हजार 383 इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 556 जणांचा मृत्यू झाला आहे.

एप्रिल महिन्यात पुणे जिल्ह्याच्या मृत्यूदर हा सर्वाधिक म्हणजे 9 टक्के इतका झाला होता. त्यानंतर हा मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. या टास्क फोर्सने मृत्यूदर खाली आणण्यात यश मिळवलं असलं तरी, मागच्या आठवड्याभरात शहर आणि जिल्ह्यातील मृत्यूची वाढती संख्या पाहता पुण्याचा मृत्यूदर हा मुंबईपेक्षा जास्त आहे. पुण्याचा मृत्यूदर हा 2.65 टक्के इतका आहे (Pune Corona Virus Death Rate).

गेल्या सात दिवसात पुण्यात 543 जणांचा कोरोनाने मृत्यू

18 ऑगस्ट

– पुणे शहरातील मृत्यू – 41

– पुणे जिल्ह्यातील मृत्यू – 96

19 ऑगस्ट

– पुणे शहरातील मृत्यू – 47

– पुणे जिल्ह्यातील मृत्यू – 90

20 ऑगस्ट

– पुणे शहरातील मृत्यू – 42

– पुणे जिल्ह्यातील मृत्यू – 71

21 ऑगस्ट

– पुणे शहरातील मृत्यू – 44

– पुणे जिल्ह्यातील मृत्यू – 65

22 ऑगस्ट

– पुणे शहरातील मृत्यू – 46

– पुणे जिल्ह्यातील मृत्यू – 69

23 ऑगस्ट

– पुणे शहरातील मृत्यू – 51

– पुणे जिल्ह्यातील मृत्यू – 61

24 ऑगस्ट

– पुणे शहरातील मृत्यू – 58

– पुणे जिल्ह्यातील मृत्यू – 91

मागील आठवड्यात मृत्यू झालेल्यांची वाढती संख्या ही चिंताजनक आहे. शहरातील कोरोना रुग्ण आणि मृत्यू काही प्रमाणात कमी होत असले तरी ग्रामीण भागात हे प्रमाण वाढत आहे. या मागच महत्वाचे कारण म्हणजे लक्षण आढळून आल्यावर ग्रामीण भागातील लोक लवकर उपचार घेत नाहीत. त्याचबरोबर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा काही प्रमाणात अभाव आहे. त्यामुळे उपचारासाठी शहरात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती मृत्यू संख्या पाहता नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण याच बरोबर ग्रामीण भागातही अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

Pune Corona Virus Death Rate

संबंधित बातम्या :

कोरोना रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत याची दक्षता घ्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

पुण्यात खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट, पाच दिवसात 29 लाखांची अतिरिक्त बिले कमी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.