Pune Corona Update : पुण्यात दिवसभरात 71 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजार पार
पुणे जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2,122 झाली आहे. तर, जिल्ह्यात आज चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
![Pune Corona Update : पुण्यात दिवसभरात 71 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजार पार Pune Corona Update : पुण्यात दिवसभरात 71 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजार पार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2020/05/02002934/corona-image-.jpg?w=1280)
पुणे : राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत (Pune Corona Virus Patients) चालली आहे. लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता आता वाढली आहे. पुणे जिल्ह्यात सोमवारी (4 मे) 71 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2,122 झाली आहे. तर, जिल्ह्यात आज चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 115 वर पोहोचली आहे. शिवाय, आज 54 रुग्ण (Pune Corona Virus Patients) बरेही झाले आहेत.
पुणे शहरात कोरोनाचे 1, 878 रुग्ण
पुणे शहरात आज 61 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,878 झाली आहे. मात्र, गेल्या 24 तासात सहा कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीवही गनवावा लागला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 107 वर पोहोचली आहे. तर, दिवसभरात 50 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
Corona Updates: महाराष्ट्रात 771 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकूण आकडा 14 हजार 541 वरhttps://t.co/GCtPPv34Dj#CoronaUpdates #Maharashtra #Lockdown
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 4, 2020
कोरोनाला आळा घालण्यासाठी चार सनदी अधिकाऱ्यांवर जबाबदारी
पुण्यातील कोरोनावर आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार सनदी अधिकार्यांची नियुक्ती केली होती. मनपा प्रशासनाशी समन्वय साधून कोरोनावर आळा घालण्याचं महत्त्वाचं काम त्यांच्यावर आहे. त्यामुळे या चारही सनदी अधिकाऱ्यांकडे हॉटस्पॉट (Pune Corona Virus Patients) क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली.
साखर आयुक्त सौरभ राव यांच्याकडे भवानी पेठ आणि ढोले पाटील रोड क्षत्रिय कार्यालयाची जबाबदारी निश्चित केली. तर सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे कसबा विश्रामबाग आणि कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे शिवाजी नगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदार आहे. तर भुजल सर्वेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे येरवडा कळस धानोरी क्षत्रिय कार्यालयाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचे 14 हजार 541 रुग्ण
महाराष्ट्रात आज (4 मे) दिवसभरात एकूण 771 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 541 वर गेली आहे (Total Corona Patient of Maharashtra). दिवसभरात 350 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत राज्यातील एकूण 2 हजार 465 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. या सर्वांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. या व्यतिरिक्त राज्यात सध्या 1 लाख 98 हजार 42 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच 13 हजार 6 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Pune Corona Virus Patients
कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या :
पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच, भवानी पेठेत 39 नवे रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?
पुणे जिल्ह्यात मद्य विक्री आणि उत्पादनाला परवानगी, कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम
पुण्यात पोलिसाचा पहिला कोरोनाबळी, 50 वर्षीय पोलिसाचा मृत्यू
पुण्यात अनोखं लग्न, मुलाचे वडील देहरादूनमध्ये, मुलीचे वडील नागपुरात, पोलिसांकडून कन्यादान