Pune Corona | पुण्याची कोरोना आकडेवारी चुकीची, यंत्रणांच्या समन्वयाअभावी आकड्यात घोळ
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव आहे. दोन विभागातील उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या आकडेवारीमध्ये तफावत आहे.
पुणे : राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे (Pune COVID-19 Total Active Cases). मात्र, दोन सरकारी यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं दिसतं आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव आहे. दोन विभागातील उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या आकडेवारीमध्ये तफावत आहे. दोन्ही विभागातील माहितीत गोंधळ असल्याने पुणेकरांची चिंता मात्र वाढली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पुण्यात तब्बल 36 हजार 810 ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचा उल्लेख केला. तर मुंबईत 23 हजार 704 आणि ठाण्यात 36 हजार 219 रुग्ण संख्या नमूद केली (Pune COVID-19 Total Active Cases).
चुकीच्या आकडेवारीमुळे पुण्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही मुंबई आणि ठाण्यापेक्षा जास्त दिसत आहे.
मात्र, झेडपीच्या जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात 19 हजार रुग्ण आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पुण्यातील ॲक्टिव रुग्ण हे मुंबई आणि ठाण्यापेक्षा कमी आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांची बाधित रुग्णांचे मृतांची आणि ॲक्टिव रुग्णांची माहिती दिली जाते.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
आरोग्य विभागाची हीच माहिती सरकारी पातळीवर ग्राह्य धरली जाते. मात्र, गेल्या काही दिवसात पुण्याची आकडेवारी ही वाढीव दाखवल्याचं दिसत आहे. आरोग्य विभागाच्या चुकीच्या आकडेवारीमुळे पुणे हे राज्यातील हॉटस्पॉट असल्याचं चित्र निर्माण झालं आहे (Pune COVID-19 Total Active Cases).
पुणे जिल्हा प्रशासनाचं स्पष्टीकरण
“रुग्णांची माहिती अपडेट करण्याचे काम हे खासगी दवाखाने करत असतात. अनेकवेळा ही माहिती वेळेवर अपडेट केली जात नाही. त्याचबरोबर काही रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असतात. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये या रुग्णांची डबल एन्ट्री होते. मात्र, हा डाटा क्लिनिंग करण्याचे काम सुरु आहे. एक-दोन दिवसात हा विषय मार्गी लागणार आहे, असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं.
एकीकडे पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या नाकीनऊ आलं आहे. त्यातच राज्य आरोग्य विभागाकडून चुकीची माहिती दिली जात असल्यामुळे प्रशासन आणि नागरिक गोंधळले आहेत.
Corona Vaccine | ऑक्सफर्डची कोरोना प्रतिबंधात्मक लस डिसेंबरमध्ये बाजारात, सिरम इन्स्टिट्यूटचा दावा https://t.co/GVOek2l9Zu #coronavirus #coronavaccine
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 22, 2020
Pune COVID-19 Total Active Cases
संबंधित बातम्या :
कोरोनामुक्तीनंतर पुण्याच्या महापौरांचा पुन्हा धडाका, बेड्सचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना
केमिस्टकडे जाण्याच्या बहाण्याने दुबईला पळ, कोरोनाग्रस्त महिलेवर हिंजवडीत गुन्हा