Corona : पुण्यात एका दिवसात 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 12 नवे रुग्ण

पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 25 जणांचा बळी गेला आहे. तर एका दिवसात 12 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

Corona : पुण्यात एका दिवसात 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 12 नवे रुग्ण
Follow us
| Updated on: Apr 10, 2020 | 8:40 AM

पुणे : कोरोनाचं सावट दिवसेंदिवस वाढतच (Pune Deaths Due To Corona) चाललं आहे. पुण्यात तर कोरोनाने अक्षरश: थैमान घातलं आहे. पुण्यात एका दिवसात सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Pune Deaths Due To Corona).

पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही वाढत आहे. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 25 जणांचा बळी गेला आहे. तर एका दिवसात 12 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत शहरातील कोरोना बाधितांची वाढ काहिसी आटोक्यात आल्याचं चित्र आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 7 रुग्णांना इतर आजारांनीही ग्रासलेलं होतं. तर, अनेक मृतांचं वयोमान हे 55 वर्षांवरील होतं. गुरुवारी सात वाजेपर्यंत जिल्ह्यात कोरोना ग्रस्त संख्या 206 वर येऊन पोहोचली होती. तर, पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या 181 इतकी आहे.

दुसरीकडे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत (Pune Deaths Due To Corona). मुंबईत झोपडपट्टी भागात लहान घरांमध्ये राहाणाऱ्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था आता शाळांमध्ये केली जाणार आहे. याशिवाय, सार्वजनिक शौचालयं दर तासाला धुतली जाणार असून निर्जंतुकीकरण केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.

कोरोनापाढोपाढ राज्यात सारीचे रुग्ण

राज्यात कोरोना विषाणूचे आव्हान असतानाच राज्यातील विविध शहरांमध्ये आता सारी आजार पसरल्याचे समोर आलं आहे. औरंगबाद, हिंगोली, पिंपरी चिंचवड येथे सारी आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. सारी आणि कोरोनाची लक्षणं एकसारखीच असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे सारीच्या एका रुग्णाला कोरोना झाल्याचेही समोर आलं आहे. त्यामुळे सारीच्या रुग्णांवरही बारीक लक्ष ठेवलं जात आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनासह आता सारी आजाराचे संकट ओढावले आहे. एका महिलेमध्ये सिव्हीअरली अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस अर्थात सारीची लक्षणं आढळून (Sari) आली आहेत. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सारी आणि कोरोनाची लक्षणं ही एकसारखीच आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील महिलेला सारीसह कोरोनाचीही लागण झाल्याचे निष्पन्न झाले (Pune Deaths Due To Corona) आहे.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.