देहू, आळंदी पालखी सोहळ्याबाबत दोन दिवसात निर्णय, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
संत तुकाराम महाराजांची पायी वारी आणि पालखी सोहळा स्वरुप नेमकं कसं असेल याबाबत निर्णय घेतला (Covid 19 Dehu Alandi Palkhi) जाणार आहे.
पुणे : वारकरी संप्रदायाची परंपरा असणाऱ्या ऐतिहासिक अशा श्री. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देहू आळंदी पालखी सोहळयाचे नियोजन, स्वरुप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतची माहिती दिली. (Covid 19 Dehu Alandi Palkhi)
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील यासह इतर मंडळीही उपस्थित होती.
वारकरी संप्रदायाची परंपरा असणाऱ्या ऐतिहासिक अशा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. कोरोनाच्या संसर्गाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे याबाबत या दोन्ही संस्थान प्रमुखांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यानुसार टाळेबंदीचे स्वरुप पाहता आळंदी ते पंढरपूर असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची पायी वारी आणि पालखी सोहळा स्वरुप नेमकं कसं असेल याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सोशल डिस्टसिंग बाबत शासनाची नियमावली, टाळेबंदीची परिस्थिती, येत्या काळातील संभाव्य चित्र, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळयाचे स्वरूप नेमके कसे असावे, त्याचे नियोजन कशा प्रकारे करावे या बाबत शासनाच्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल. (Covid 19 Dehu Alandi Palkhi)
“शासनाने दिलेल्या सूचनांचे अत्यंत काटेकोर पालन करु. तसेच आम्ही कमी संख्येत पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवू,” असं मत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी सांगितले.
“आषाढी वारीची परंपरा अबाधित रहावी यासाठी तसेच या सोहळयासाठी गरजेच्या आवश्यक त्याच सुविधा शासनाकडून अपेक्षित आहेत. आम्ही समाजाची काळजी घेत तसेच शासनाचा नियमावलीचे पालन करु. या पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवू,” असा विश्वास देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे यांनी व्यक्त केला.
या बैठकीमध्ये पालखी सोहळयाचे स्वरुप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग,प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी संख्या तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात (Covid 19 Dehu Alandi Palkhi) आली.
संबंधित बातम्या :