तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील 106 जण पुण्याचे, 94 जण क्वारंटाईन, उर्वरितांचा तपास सुरु : पुणे विभागीय आयुक्त
नवी दिल्लीतील 'तब्लिगी ए-जमाती'च्या मेळाव्यात पुणे (Pune District commissioner on Tablighi Jamaat Nizamuddin event) विभागातील 182 जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली.
पुणे : पुणे विभागातील निजामुद्दीन ‘तब्लिगी ए-जमाती’च्या (Pune District commissioner on Tablighi Jamaat Nizamuddin event) मेळाव्यातील 182 जणांची यादी नुकतीच प्राप्त झाली आहे. यातील 106 जण पुणे विभागात आढळले आहेत. तर उर्वरितांचा तपास जलदगतीने सुरु असल्याचे पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना सांगितले.
नवी दिल्लीतील ‘तब्लिगी ए-जमाती’च्या मेळाव्यात पुणे (Pune District commissioner on Tablighi Jamaat Nizamuddin event) विभागातील 182 जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली. यात पुण्यातील 136, साताऱ्यातील 5, सांगलीतील 3, सोलापुरातील 17 आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 21 जणांचा समावेश आहे. या माहितीची छानणी करताना त्यातील काही नावे दोनदा आढळून आली. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त 7 व्यक्ती आहेत.
तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील 182 जणांपैकी 106 जण आढळून आले आहेत. यात पुण्यातील 70, साताऱ्यातील 5, कोल्हापुरातील 10 तसेच सांगली आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यातील 106 जणांना ट्रेसिंग करण्यात आले आहेत. यातील 94 जण क्वारंटाईन आहे. या सर्वांचे स्त्राव नमुना अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या यादीतील 51 व्यक्तीच्या कॉल रेकार्डनुसार ते बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे. तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे. काहींनी भ्रमणध्वनी सिमकार्ड बदलले असल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आली आहे. ही माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
पुण्यातील 51 जण इतर राज्यातील असल्याची माहिती मिळाली असून या संदर्भात खात्री केली जात आहे. पुणे विभागातील 182 जणांचा तपास सुरु असून ते विभागात असतील तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल व त्यांचे स्त्राव नमुने घेतले जातील. स्त्राव नमुन्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी (Pune District commissioner on Tablighi Jamaat Nizamuddin event) दिली.