Exam controversy | अंतिम वर्षाच्या परीक्षेला पुण्यातील महाविद्यालयांची तयारी, मात्र मनसेचा तीव्र विरोध
राज्यातील कुठल्याही संस्थेला प्रवेशाचे थेट अधिकार दिले जाऊ नये. प्रवेश परिक्षेद्वारेच प्रवेश घेण्यात यावे, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेने केली आहे.
पुणे : पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांनी (Pune MNS Vidyarthi Sena On Exam Controversy) महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यास सकारात्मकता दर्शविली. मात्र, या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या शिक्षण संस्थांचा शैक्षणिक भ्रष्टाचार करण्याचा छुपा कट असल्याचा आरोप केला आहे. या विरोधात तीव्र आंदोलन करुन हा कट उधळून लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण (Pune MNS Vidyarthi Sena On Exam Controversy) विद्यार्थी सेनेने दिला आहे.
महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाची परीक्षेसंदर्भात संस्थांच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. यासंदर्भात राज्यपाल आणि आयुक्तांना निवेदन दिलं आहे, असं मनसे विद्यार्थी सेनेने सांगितलं आहे.
या शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी असल्याचा आव आणत आहेत. मात्र परीक्षा झाल्यावर एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली, तर याला जबाबदार कोण? शिक्षण हिताचा खोटा मुखवटा घातलेल्या संस्था जबाबदारी घेतील का, असा सवाल मनसे विद्यार्थी सेनेने केला आहे (Pune MNS Vidyarthi Sena On Exam Controversy).
या शैक्षणिक संस्था एकाबाजूला अंतिम वर्षाच्या परीक्षा गरजेचे असल्याचे म्हणतात. मात्र, प्रवेश परीक्षा रद्द करण्याची मागणी करतात. हा दुटप्पीपणा असल्याचा आरोपही मनसे विद्यार्थी सेनेने केला आहे. संस्थांना प्रवेशाचे संपूर्ण अधिकार दिल्यास या संस्था शिक्षणाला काळिमा फासतील आणि स्वतःची घर भरतील, असा आरोपही मनसे विद्यार्थी सेनेकडून करण्यात आला आहे.
त्यामुळे राज्यातील कुठल्याही संस्थेला प्रवेशाचे थेट अधिकार दिले जाऊ नये. प्रवेश परिक्षेद्वारेच प्रवेश घेण्यात यावे, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेने केली आहे.
परीक्षा घ्या, सीईटी नको, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पणाला न लावण्याची पुण्यातील नामवंत शिक्षण संस्थांची मागणीhttps://t.co/tAV8kMxsFw#Pune #FinalExam #CoronaEffect
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 13, 2020
Pune MNS Vidyarthi Sena On Exam Controversy
संबंधित बातम्या :
पुणे विभागातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 62.95 टक्के, 8 हजार 862 जण कोरोनामुक्त
लाॅकडाऊनमध्ये परीक्षा घेणाऱ्या तळेगावातील महाविद्यालयावर प्रशासनाची मोठी कारवाई