Pune Corona | 74 हॉस्टेल्स, 300 शाळा सज्ज, पुण्यात कोरोना लढ्यासाठी प्रशासनाची काय काय तयारी?
शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहरातील तीन रुग्णालयं कोरोना रुग्णांनी फुल्ल झाले आहेत.
पुणे : पुण्यात कोरोनाचा धोका कमी (Pune Fights Corona) होताना दिसत नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यात काल दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक 104 नवे रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहरातील तीन रुग्णालयं कोरोना रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. त्यामुळे आता शहरातील वसतिगृह अधिग्रहित केली जात आहेत. पुण्यातील 74 हॉस्टेल्स, 300 शाळा (Pune Fights Corona) कोरोना रुग्णांसाठी सज्ज केल्या जात आहेत.
पुण्याला कोरोनाचा विळखा आखणीच घट्ट होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांमध्ये रोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. काल दिवसभरात 104 नवीन रुग्ण वाढल्याने पुणेकरांची चिंता अजूनच वाढली आहे. पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर कमी करणे प्रशासनासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे.
पुण्यातील वॉर्डनिहाय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या
वॉर्ड | रुग्णसंख्या |
---|---|
भवानी पेठ | 187 |
ढोले पाटील रोड | 122 |
कसबा- विश्रामबाग | 114 |
येरवडा, कळस, धानोरी | 101 |
शिवाजीनगर, घोलेरोड | 90 |
धनकवडी, सहकारनगर | 45 |
वानवडी, रामटेकडी | 43 |
हडपसर, मुंढवा | 28 |
नगर रोड, वडगावशेरी | 21 |
कोंढवा, येवलेवाडी | 12 |
सिंहगडरोड | 10 |
वारजे, कर्वेनगर | 09 |
औंध, बाणेर | 03 |
कोथरुड, बावधान | 01 |
पुण्याबाहेरचे | 41 |
पुण्यात कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या ही भवानी पेठेत आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भिती आहे. या आठवड्याच्या शेवटी 1500 आणि 15 मेपर्यंत तीन हजार पर्यंत रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शहरातील 14 खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरु असून दर आठवड्याला दोन नवीन रुग्णालयांशी करार केला जात आहे.
कोरोना रुग्णांसाठी 74 हॉस्टेल अधिग्रहित असून त्यामध्ये 43 हजार रुग्णांची क्षमता आहे. तर 300 शाळांमध्ये 20 हजार नागरिकांची सोय करण्याचे नियोजन आहे. दिलासादायक म्हणजे, मॅथेमॅटिक मॉडेलनुसार अपेक्षित रुग्ण वाढलेले नाहीत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे पोलिसांनी कडक कारवाई (Pune Fights Corona) करण्यास सुरुवात केली आहे.
Pune Corona : पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू, बालेवाडीत क्वारंटाईन केलेले 300 पैकी 24 जण कोरोना पॉझिटिव्हhttps://t.co/ngm5YeH0vQ#PuneFightsCovid19 #Corona #CoronaVirusUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 24, 2020
संचारबंदीत पोलिसांनी केलेली कारवाई –
– 24 मार्च ते 23 एप्रिल या एका महिन्यात संचारबंदीचा भंग करणाऱ्या 15 हजार 44 जणांवर गुन्हे दाखल
– दररोज सुमारे एक हजार वाहने जप्त केली जात आहेत
– आतापर्यंत 34 हजार 42 वाहने जप्त
– तर 37 हजार 583 जणांना नोटीस
पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी आता प्लाझ्मा थेरिपीचा वापर केला जाणार आहे. येत्या काही दिवसात बी. जे. मेडीकल कॉलेजमध्ये या उपचार पद्धतीला सुरुवात होणार आहे. यामुळे निश्चितच कोरोनाचा अटकाव करण्यास मदत (Pune Fights Corona) होणार आहे.
संबंधित बातम्या :
पुण्यात आझम कॅम्पसची प्रार्थनास्थळाची दुमजली इमारत क्वारंटाईनसाठी बहाल, नागरिकांच्या जेवणाचीही सोय
पिंपरी-चिंचवडमध्ये विळखा वाढला, कोरोनाग्रस्त तरुणाच्या संपर्कातील 11 जण पॉझिटिव्ह
बारामतीत एकाच कुटुंबातील चौघे ‘कोरोना’मुक्त, तालुक्यात आता एकच रुग्ण!