Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Ganeshotsav | गणेशमूर्तीची खरेदी ऑनलाईन, मिरवणूक नाही, पुणे पोलिसांची नियमावली

पुण्यातील गणेश उत्सव संदर्भात पुणे पोलीस प्रशासनाने नियमावली जारी केली आहे.

Pune Ganeshotsav | गणेशमूर्तीची खरेदी ऑनलाईन, मिरवणूक नाही, पुणे पोलिसांची नियमावली
Follow us
| Updated on: Aug 18, 2020 | 11:38 AM

पुणे : पुण्यातील गणेश उत्सव संदर्भात पुणे पोलीस प्रशासनाने नियमावली जारी (Pune Ganeshotsav Police Guidelines) केली आहे. यामध्ये मूर्ती खरेदी करणे, गणेश आगमन ते प्रतिष्ठापना यासर्वांबाबत नियम घालून देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गणेशोत्सवासाठी हे नवे नियम जारी केले आहेत (Pune Ganeshotsav Police Guidelines).

गणेश मूर्तीची खरेदी ऑनलाईन करावी

गणेशोत्सव मंडळांनी मूर्तींची खरेदी ऑनलाईन पद्धतीने करावी. मनपा क्षेत्रीय कार्यालयात शाळांची पटांगण, मोकळ्या जागांवर मूर्ती विक्रीकराता परवानगी दिली जाईल. मात्र, रस्ता, पदपथांवर परवानगी दिली जाणार नाही.

श्री गणेश आगमन वेळी मिरवणुकीवर बंदी

श्री गणेशाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढता येणार नाहीत. आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी धार्मिक विधीसाठी कमीत कमी नागरिकांनी एकत्र यावं, असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे.

श्री गणेश प्रतिष्ठापना मंदिरातच

ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मंदिरे आहेत, त्यांनी प्रतिष्ठापना मंदिरात करावी. अन्यथा नियम आणि अटी पाळून मंडळात छोटे मंडप करिता परवानगी दिली जाईल.

पुण्यातील गणेश मंडळांनी मंदिरं नसलेल्या मंडळांना गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याची परवानगी द्या, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर पुणे पोलिसांनी मंदिरं नसलेल्या मंडळांना छोटे मंडप उभारण्यास परवानगी दिली जाईल, असं सांगितलं आहे (Pune Ganeshotsav Police Guidelines).

गणेश मूर्तीची उंची

सार्वजनिक मंडळांची गणेश मूर्ती चार फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची दोन फूट मर्यादित असावी.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएल बस सेवा सुरु होणार

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. त्यामुळे तब्बल 5 महिन्यांनंतर पीएमपीएल रस्त्यावर धावणार आहे. 22 ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पीएमपीएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन आणि पीएमपीएलच्या या निर्णयामुळे पुण्यातील नागरिकांना दळणवळणात मोठी मदत होणार आहे.

Pune Ganeshotsav Police Guidelines

संबंधित बातम्या :

मंदिरं नसलेल्या गणेश मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी द्या, पुण्यातील गणेशोत्सव समितीची मागणी

पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद, मूर्तीदानाचीही व्यवस्था

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.