पुणे : एका गरोदर महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक(Woman Rape and Murder) घटना जुन्नर तालुक्यात घडली. जुन्नरच्या कांदळी उंबरकास शिवारात सोमवारी (7 एप्रिल) दुपारी ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे या 22 वर्षीय महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत ऊसाच्या शेतात फेकण्यात आला. त्यामुळे महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात (Woman Rape and Murder) आहे.
ही महिला शेतात गवत कापण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही, म्हणून तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी ही महिला ऊसाच्या शेतात विवस्र अवस्थेत आढळून आली.
महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला होता. तसेच ती विवस्त्र अवस्थेत आढळ्याने महिलेवर बलात्कार करुन तिचा निर्घृण खून करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे(Woman Rape and Murder).
मृत महिलेला एक तीन वर्षाची मुलगी असून ती गरोदर होती. या महिलेवर बलात्कार करुन खून झाला असल्याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे. सदरच्या महिलेचा मृतदेह नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून नारायणगाव पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत(Woman Rape and Murder).