Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात घरपोच दारु विक्रीला परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर

पुण्यात घरपोच दारु विक्रीबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नुकतंच नियमावली जाहीर (Pune Liquor Home Delivery Rules) केली.

पुण्यात घरपोच दारु विक्रीला परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 11:40 AM

पुणे :राज्य उत्पादन शुल्क विभागाने ई टोकन पद्धतीने दारु विक्रीला परवानगी (Pune Liquor Home Delivery Rules) दिली आहे. यानंतर राज्यात 15 मे पासून  घरपोच दारु विक्री केली जाणार आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने यासाठी काही अटी आणि शर्ती ठेवल्या असून त्यानुसारच मद्यविक्री होणार आहे. पुण्यात घरपोच दारु विक्रीत ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी बंधनकारक असणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलं.

पुण्यातील ग्राहकांना दारु मिळल्यानंतरच त्याचे पैसे द्यायचे (Pune Liquor Home Delivery Rules) आहेत. घरपोच दारु विक्रीबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नुकतंच नियमावली जाहीर केली. तसेच जो या नियमावलीचे उल्लंघन करेल त्याच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात घरपोच दारु विक्रीबाबत नियमावली

 1) कंटेनमेंट झोन आणि त्यालगत 500 मीटर क्षेत्रातील दारु विक्री दुकानं वगळून इतरांना घरपोच दारु देता येईल.
2) घरपोच मद्य विक्रीमध्ये देशी दारुची घरपोच सेवा देता येणार नाही.
3) घरपोच दारु विक्रीची सुविधा ही परवानाधारकांना उपलब्ध असेल. परवाना नसलेल्या ग्राहकांना संकेतस्थळावर परवाना तत्काळ उपलब्ध होईल
4) मद्याची नोंदणी परवाना धारक ग्राहकाला व्हाट्सअॅप, भ्रमणध्वनी, दूरध्वनी माध्यमातून करु शकता. हे क्रमांक दारु विक्रेत्यांना ठळकपणे दुकानासमोर प्रदर्शित करावे.
5) दारुची मागणीप्रमाणे घरपोच सेवा देण्यासाठी दारु विक्रेत्यांना स्वतःची वितरण व्यवस्था निर्माण करावी.
6) वाहतूक परवानाऐवजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याचं मंजूर केलेलं ओळखपत्र देण्यात येईल.
7) दहापेक्षा जास्त मनुष्यबळ दारु विक्रेत्याकडून नसावं. ओळखपत्र असलेली व्यक्ती एकावेळी ग्राहकांच्या मागणीपेक्षा अधिक वाहतूक करणार नाही. अशा व्यक्तीने 24 युनिटपेक्षा जास्त मद्याची वाहतूक करणार नाही.
8) प्रशासनाने ठरवून दिलेल्या कालावधीतच मद्यविक्री केले जाईल.
9) मद्याची रक्कम ही रोख स्वरुपात अथवा क्रेडिट डेबिट कार्ड स्वाईप मशीनच्या माध्यमातून डिलिव्हरी बॉयनं स्विकारावी.
10) मद्य छापील किमतीपेक्षा अतिरिक्त शुल्क घेऊ नये किंवा सेवाशुल्क घेऊ नये.
मद्याची डिलिव्हरी करणाऱ्या बॉयसाठी महत्त्वाच्या सूचना
  • दारुच्या डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय तपासणी करावी. तपासणीचा प्रमाणपत्रसोबत बाळगावे.  प्रमाणपत्र धारकाला ओळखपत्र द्यावं.
  • मास्क, हेड कॅप, हॅन्ड ग्लोज बंधनकारक
  • हॅन्ड सॅनिटायझर वेळोवेळी वापरावे
  • दारु विक्रेत्यांनी डिलिव्हरी बॉईजचं थर्मल स्कॅनिंग वेळोवेळी करावं.
  • तापमान जास्त आढळले तर ओळखपत्र त्वरित काढून घ्यावं. वैद्यकीय तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सुविधा द्यावी.
  • सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार घरपोच  मद्य वितरण करावं.
  • एखाद्या डिलिव्हरी बॉईज काम सोडलं तर त्वरित ओळखपत्र घ्यावं
  • घरपोच मद्यविक्रीच्या विशेष नोंदी कराव्यात. घरपोच मद्यविक्री केलेल्या एक अतिरिक्त स्वतंत्र नोंदवही ठेवावी.
  • ग्राहकांना दुकानातून थेट मध्ये विक्री करण्यास कोणतीही बाधा येणार नाही.
  • सोशल डिस्टन्स ठेवावेत. या नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा

दरम्यान, लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशात दारुची दुकानं बंद करण्यात आली होती. जवळपास 40 दिवसांनंतर 4 मे रोजी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील अनेक भागात दारुची दुकानं सुरु करण्यात आली. दुकानं सुरु करताच दुकानाबाहेर मद्यप्रेमींनी मोठ्या रांगा लावल्या. यावेळी मद्यप्रेमींनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडले. त्यामुळे दारुची दुकानं उघडल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र आता ऑनलाईन पद्धत वापरुन दारुविक्री सुरु करण्याची निर्णय सरकारने घेतला (Pune Liquor Home Delivery Rules) आहे.

संबंधित बातम्या 

दारु खरेदीसाठी आता ई-टोकन सुविधा, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अनोखी उपाययोजना

Online Liquor | ऑनलाईन दारु विक्रीला परवानगी, घरपोच दारु मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.
संतोष देशमुख हत्या प्रकरण: गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरण: गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय?.
निर्घृण हत्येनंतर..., संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड
निर्घृण हत्येनंतर..., संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड.
'माझी इच्छा नसतानाही पुरूष...', पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप
'माझी इच्छा नसतानाही पुरूष...', पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप.
'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले
'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले.
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा.
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.