Pune Lockdown | 17 मेनंतर पुण्यात फक्त कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध, 97 टक्के भागात जास्त सुविधा सुरु : आयुक्त

पुण्यातील 3 टक्के कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम राहतील आणि 97 टक्के भागात जास्त सुविधा मिळणार आहे

Pune Lockdown | 17 मेनंतर पुण्यात फक्त कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध, 97 टक्के भागात जास्त सुविधा सुरु : आयुक्त
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 9:15 PM

पुणे : तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 17 तारखेला (Pune Lockdown Update) संपणार आहे. त्यामुळे सहाजिकच पुणेकरांच्या नजरा या पुण्यातील पुढील निर्बंध कसे असतील याकडे लागलेल्या आहेत. पुण्यातील 3 टक्के कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम राहतील आणि 97 टक्के भागात जास्त सुविधा मिळणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त शेखर गायकवाड (Pune Lockdown Update) यांनी दिली.

कंटेनमेंट झोन हा छोटा आणि मर्यादित केलेला आहे. तिथे सध्याची कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता काही उघडले जाण्याची आणि शिथिलता आणण्याची शक्यता फार कमी असल्याचं आयुक्तांनी म्हटलं.

दुसरीकडे, शहरात मात्र अधिकाधिक दुकानं आणि व्यापारी आस्थापनं उघडले जातील. खाजगी व्यवस्था, व्यापारी आस्थापनं सरकारी कार्यालय 100% सुरु करणे आणि सर्व प्रकारचे उद्योगधंदे सुरु करण्याचा विचार आहे. या महत्त्वाच्या तीन गोष्टींवर सरकारचे आदेश अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी म्हटलं. हे करत असताना कंटेनमेंट झोनमधील सामान्य माणसाला त्रास होणार नाही. त्याला सुसह्य होईल, रोजगार मिळाला आणि जीवनावश्यक वस्तू मिळाल्या पाहिजेत, असा दुहेरी प्रयत्न सुरु आहे, असंही आयुक्तांनी म्हटलं.

31 मेपर्यंत पुण्यात 5 हजार कोरोना रुग्ण असतील : आयुक्त शेखर गायकवाड

त्याचबरोबर सध्याच्या नियमावलीनुसार 31 मे अखेर पुण्यात 5 हजार रुग्ण असतील आणि 2 हजार क्वारंटाईन असतील, असेही आयुक्तांनी सांगितलं. तर स्वॅब टेस्टिंग मागच्या आठवड्यात 900 पर्यंत घेत होतो (Pune Lockdown Update). मात्र, आता ते 1200 पर्यंत पोहोचले. त्यामुळे जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तर रुग्ण डबल होण्याचा कालावधी हा 13 दिवसांवर आलेला आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

पुण्याचा कोरोना मृत्यूदर 5.4 टक्क्यांवर

पुण्याचा कोरोना मृत्यूदर हा एकेकाळी 14 टक्क्यांवर म्हणजेच देशात सर्वाधिक होता. मात्र, सध्या पुण्याचा कोरोना मृत्यूदर तो 5.4 टक्क्यांवर घसरला आहे. तो राज्याच्या आणि राष्ट्रीय दरापेक्षा जास्त असला तरी टेस्टिंग वाढल्यानंतर पंधरा दिवसानंतर आपण स्टेट आणि नंतर नॅशनल बरोबर येऊ, असंही पालिका आयुक्तांनी सांगितलं.

Pune Lockdown Update

संबंधित बातम्या :

पुण्यातील प्रतिबंधित भागात निर्बंध अधिक कडक, भाजीपाला विक्रेत्यांनाही बंदी

पुण्यात अ‍ॅम्ब्युलन्ससाठी तीन तास ताटकळत, खुर्चीवर बसून वाट पाहणाऱ्या रुग्णाने बायको-मुलासमोर प्राण सोडले

पुण्यात कोरोनाच्या भीतीने तरुणाची आत्महत्या, मृत्यूनंतर रिपोर्ट निगेटिव्ह

पुण्यातील विवाह इच्छुकांना दिलासा, 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न करता येणार

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.