रिपोर्टपूर्वीच पुण्यात एक हजार कोरोनाबळी, महापौरांचा दावा, मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
"कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झालेल्यांची संख्या एक हजार (Pune Mayor Muralidhar Mohol) आहे.
पुणे : “कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झालेल्यांची संख्या एक हजार (Pune Mayor Muralidhar Mohol) आहे. हे एक हजार रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच किंवा दाखल झाल्यानंतर लगेच काही तासात मृत्युमुखी पडले आहेत.”, असा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. तसेच मृत झालेल्यांचे आकडे दर्शवले जात नाहीत. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही महापौरांनी काल (30 जुलै) झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केली (Pune Mayor Muralidhar Mohol) .
“प्रशासनाने हे मृत्यू लपवल्याचा आरोप नाही, मात्र याबाबत चौकशी करावी आणि अशाप्रकारे मृत्यू न होण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे”, असं मोहोळ यांनी सांगितले.
“ससून रुग्णालयात दररोज बारा आणि खासगी रुग्णालयात 50 रुग्णांचा मृत्यू होत आहे. दर महिन्याला चारशे पाचशे मृत्यू होतात, रुग्णाच्या क्ष किरण अहवालात रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचे दिसून येते. यासंदर्भात ससून रुग्णालयाने, केंद्रीय समितीने पुष्टी दिल्याचा दावाही महापौर यांनी केला आहे.”
“रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल मृत्यूनंतर येत असल्याने कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून दाखवलं जात नाही”, असंही मोहोळ यांनी या बैठकीत सांगितले.
दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी सुरुवातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही होते.
संबंधित बातम्या :
Pune corona | मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी, अजित पवारही म्हणाले, जनाची नाही तर…