पुण्यातील स्थलांतरित मजुरांची पहिली यादी तयार, 15 हजार नागरिकांचा समावेश

पुणे प्रशासनाकडून स्थलांतरित मजुरांची पहिली यादी तयार केली असून यात जवळपास 15 हजारहून अधिक नागरिकांचा (Pune Migrant workers list) समावेश आहे.

पुण्यातील स्थलांतरित मजुरांची पहिली यादी तयार, 15 हजार नागरिकांचा समावेश
Follow us
| Updated on: May 05, 2020 | 9:32 AM

पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने देशातील लॉकडाऊन वाढवण्यात आले (Pune Migrant workers list) आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे प्रशासनाकडून स्थलांतरित मजुरांची पहिली यादी तयार केली आहे. यात जवळपास 15 हजारहून अधिक नागरिकांचा समावेश आहे.

पुणे जिल्हा प्रशासनाला ई-मेलद्वारे अनेक स्थलांतरित मजुरांनी घरी परतण्यासाठी अर्ज केले होते. या अर्जाची छाननी करुन पुण्यातील स्थलांतरिताची पहिली यादी तयार केली आहे. यात 15 हजार 502 परप्रांतीयांचा मूळ गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यात सर्वाधिक मजूर हे उत्तरप्रदेश आणि बिहारचे रहिवाशी आहे.

उत्तर प्रदेशातील जवळपास 4 हजार 048 आणि बिहारमधील 3 हजार 810 नागरिकांचा या यादीत समावेश आहे. त्याच बरोबर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या 583 नागरिकांनीही यात नोंदणी केली (Pune Migrant workers list) आहे.

संचारबंदीमुळे पुण्यात गेल्या दीड महिन्यापासून परप्रांतीय शहरातील वेगवेगळ्या भागात अडकले होते. त्यांच्या परतण्याच्या मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार नागरिकांना परवानगी देण्याची त्यांच्या नोंदणीची आणि वाहन व्यवस्था जबाबदारी पोलिसांवर देण्यात आली आहे.

दरम्यान पुण्यात 2 मे पर्यंत जवळपास साडेपाच हजार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. पुणे शहर हे रेड झोनमध्ये असल्याने नागरिकांना गावी परतण्यासाठी अडचणी येत आहेत. सध्या सर्व माहिती संकलित करण्यात येत असून अद्याप कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली (Pune Migrant workers list) आहे.

संबंधित बातम्या : 

पुण्यात 5500, तर नागपुरात साडे नऊ हजार नागरिकांचे घरी जाण्यासाठी अर्ज, वैद्यकीय तपासणीनंतर परवानगी

Lockdown : सहा दिवस पायपीट करुन परतलेल्या मजुरांना जंगलात क्वारंटाईन, वाशिममधील ग्रामपंचायतचा प्रताप

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.