Pune Corona : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा ‘मिशन झिरो’ उपक्रम

पुण्यात आता मिशन झिरो उपक्रम राबवण्यात येणार (Mission Zero Campaign Pune) आहे.

Pune Corona : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा 'मिशन झिरो' उपक्रम
Follow us
| Updated on: Aug 09, 2020 | 12:04 PM

पुणे :पुण्यात आता मिशन झिरो उपक्रम राबवण्यात येणार (Mission Zero Campaign Pune) आहे. मालेगाव आणि धारावीमध्ये मिशन झिरो उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर आता पुण्यातही राबविला जाणार आहे. पुणे महापालिकेने भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेतला आहे (Mission Zero Campaign Pune).

पुण्यात कोरोना अटकाव करण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात नुकतेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठकही पार पडली. शहरात सर्वाधिक रोज साधारण पाच ते सहा हजार टेस्ट केल्या जात आहे त्याचबरोबर ट्रेसींगवर भर देण्यात आला.

तर मृत्यूदर कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांवर, कोमॉर्बीड रुग्णांवर उपचार करण्यास भर देण्यात आलाय. त्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणि मृत्यूचा दर कमी होत असल्याचे दिसते.

काय आहे मिशन झिरो उपक्रम ?

जास्तीत जास्त नागरिकांच्या तपासण्या करून रुग्ण शोधणे.

रॅपिड ऍक्शन प्लॅन तयार करणे.

फिरत्या दवाखाण्यांची संख्या वाढविणे.

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करणे.

रिपोर्ट लवकर उपलब्ध करून देणे.

पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार.

रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या भागातून ही मोहीम राबविणे.

पुणे जिल्ह्यात काल (8 ऑगस्ट) 2 हजार 639 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. यामध्ये पुणे शहरातील 1 हजार 290 जणांचा समावेश आहे. तसेच काल 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात मृत्यूंच्या आकड्याचा आजपर्यंतचा उच्चांक नोंदला गेला आहे.

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ काल पिंपरी-चिंचवडमध्ये 987, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात 220, नगरपालिका क्षेत्रात 60 आणि कंटेन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात 82 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 1 लाख पाच हजार 523 वर पोहोचली आहे. यापैकी 76 हजार 726 उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या :

“कामगार कुठले आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या भागातले?” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा

Pune | पुणेकरांनो, हॉटेल-मॉलमध्ये जाताय? हे नियम वाचून घ्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.