पुण्यात मुस्लिम मंचाने सर्वधर्मीय कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली

प्रत्येक समाजातील 'कोरोना'ग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत, अशी माहिती मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इमानदार यांनी दिली. (Pune Muslim Manch takes responsibility to do last rites on Corona Patients Dead body)

पुण्यात मुस्लिम मंचाने सर्वधर्मीय कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली
Follow us
| Updated on: Apr 16, 2020 | 9:32 AM

पुणे : पुण्यात मूलनिवासी मुस्लिम मंचाने ‘कोरोना’बाधित मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कुठल्याही धर्मातील ‘कोरोना’ग्रस्त मृतावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेण्यास मुस्लिम मंच तयार आहे. (Pune Muslim Manch takes responsibility to do last rites on Corona Patients Dead body)

पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी ‘कोरोना’ग्रस्त मृताचे पार्थिव कुटुंबाकडे न सोपवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ही जबाबदारी कोणाकडे जाणार, हा प्रश्न होता. या मंचाच्या माध्यमातून प्रत्येक समाजातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत, अशी माहिती मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इमानदार यांनी दिली आहे.

मूलनिवासी मुस्लिम मंचाकडून पुणे महापालिकेशी या संबंधी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्याची परवानगी मिळाल्यानंतर आतापर्यंत 4 मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

हेही वाचा : सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्टला ‘कोरोना’, पुण्यात 144 गर्भवती क्वारंटाईन

‘कोरोना’बाधित मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक पुढे येत नसल्याची बाब गेल्या काही दिवसात समोर येत आहे. कुठे संपूर्ण कुटुंबातील सदस्यांनाच ‘कोरोना’ची लागण झाल्यामुळे त्यांना अंत्यसंस्कार करता येत नाहीत, तर कुठे संसर्गाच्या भीतीपोटी ‘कोरोना’बाधित मयत व्यक्तीचे कुटुंबीय अंत्यसंस्कार करण्यास पुढे येत नाहीत.

‘कोरोना’बाधिताचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवणार नाही

पुणे विभागात ‘कोरोना’बाधित रुग्णाचे निधन झाल्यास त्याचा मृतदेह कुटुंबीयांना दिला जाणार नाही, असा मोठा निर्णय पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी घेतला आहे. त्या मृतदेहावर गॅस किंवा विद्युतदाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येतील. मृतदेह दफन करायचा असल्यास शहरापासून दूर अंतरावर सहा फूट खोल खड्डा खणावा लागेल. त्यामध्ये निर्जंतुक लिक्विड टाकून मृतदेह प्लास्टिकच्या दोन बॅगांमध्ये ठेवून दफन केला जाईल.

येरवड्यातील महिलेवर तीन दिवसांनी अंत्यसंस्कार

येरवड्यात राहणाऱ्या कोरोनाग्रस्त महिलेचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला होता. या महिलेच्या कुटुंबातील इतर व्यक्तीही कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे कोणीही नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी येऊ शकले नव्हते. कुटुंबियांनी पुणे महापालिकेला लेखी परवानगी दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांनी महिलेवर अंत्यसंस्कार केले. (Pune Muslim Manch takes responsibility to do last rites on Corona Patients Dead body)

बारामतीच्या कुटुंबाचा आदर्श

बारामतीमधील ‘कोरोना’बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर मुलाने नियमानुसार वडिलांचे अंत्यविधी करण्यास परवानगी दिली होती. इस्लाम धर्मानुसार त्यांच्यासाठी प्रार्थना करुन शासकीय नियमानुसार अंत्यविधी करा, असा आदर्श निर्णय कोरोनाबाधित कुटुंबाने घेतला होता. मुलगा-सुनेसह नातींनाही ‘कोरोना’ झाल्यामुळे कोणीही त्यांना अंतिम निरोप देताना उपस्थित राहू शकले नव्हते.

संबंधित बातम्या :

‘कोरोना’बाधिताचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवणार नाही, पुणे विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय

इस्लामनुसार प्रार्थना करा, शासकीय नियमानुसार अंत्यविधी करा, बारामतीतील कोरोनाबाधित कुटुंबाचा आदर्श

पुण्यात ‘कोरोना’ग्रस्त महिलेच्या पार्थिवावर महापालिकेकडून तीन दिवसांनी अंत्यसंस्कार

(Pune Muslim Manch takes responsibility to do last rites on Corona Patients Dead body)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.