राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?

May be NCP Sharad Pawar group Will merge with Congress : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी... राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती आहे. राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 11:58 AM

योगेश, बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 14 फेब्रुवारी 2024 : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी… राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलवली आहे.राज्यात सध्या ज्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलवली आहे. बैठकीत राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा सुरू आहे. या शिवाय शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन करण्यातबाबत चर्चा सुरु आहे, अशी माहिती आहे.

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार

शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार गटाकडून मात्र या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते मंगलदास बांदल यांनी यावर भाष्य केलं आहे. शरद पवार आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पक्षाला विलीन करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे. वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील. मात्र अशी चर्चा पवारांनी बोलावलेल्या बेठकीत सुरु आहे, असं मंगलदास बांदल म्हणाले.

शरद पवार गटाची पुण्यात बैठक

लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी पक्षाची पुण्यात महत्वाती बैठक बोलवली आहे. शरद पवार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे,रोहित पवार,अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक सुरू आहे.

देशात सध्या निवडणुकीचा माहोल आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशात राष्ट्रवादी पक्षात फुट पडली. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह शरद पवार यांच्या हातून गेलं आहे. मागच्या दोन दिवसात काँग्रेसमध्येही मोठी घडामोडी घडत आहेत. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला राम-राम केला. भाजपचं कमळ चव्हाणांनी हाती घेतलं. काँग्रेसचे आणखी काही आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारी आहेत.

Non Stop LIVE Update
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.