पुण्यात कंटेनमेंट झोनमध्ये जनजागृतीसाठी पोलीस सायकलवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा अनोखा उपक्रम

पुणे पोलिसांकडून कंटेनमेंट झोनमध्ये कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी अनोखा उपक्रम राबवला जात आहे (Pune Police ride on Cycle for Corona Awareness).

पुण्यात कंटेनमेंट झोनमध्ये जनजागृतीसाठी पोलीस सायकलवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा अनोखा उपक्रम
Follow us
| Updated on: Jul 24, 2020 | 9:00 AM

पुणे : शहरातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिकेकडून वारंवार जनजागृती केली जात आहे (Pune Police ride on Cycle for Corona Awareness). आता नागरिकांच्या जनजागृतीसाठी कंटेनमेंट झोनमध्ये विशेष काळजी घेण्याच्या आवाहनासाठी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे चक्क सायकलवर फिरुन पेट्रोलिंग करत आहेत. अशावेळी ते नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांची आणि लहान मुलांची काळजी घेण्याचंही आवाहन करत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहनही करत आहेत.

दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या तब्बल 13 कंटनमेंट झोन आहेत. त्यामुळेच वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दत्तवाडी पोलिसांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे दररोज सकाळी आणि संध्याकाळी सायकलवर फिरुन नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. सायकलवर फिरताना ते नागरिकांना घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्कचा वापर करा, विनाकारण प्रवास करु नका, अत्यावश्यक सेवेसाठी पोलिसांना संपर्क करा, जेष्ठ नागरिकांसह लहान मुलांची काळजी घ्या, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचनाही करत आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पोलीस नागरिकांना अधिक खबरदारी घेण्याचं आवाहन करत आहेत. दत्तवाडी परिसरातील बहुतांश भाग झोपडपट्ट्यांचा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित हद्दीतील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी पोलिसांची व्हॅन पोहोचू शकत नाही तिथे सायकलमुळे पोहोचणे शक्य झाल्याचे पोलीस निरिक्षक घेवारे म्हणाले.

दरम्यान, शहरात कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी रॅपिड अँटिजेन चाचण्या देखील घेण्यात येत आहेत. त्यामुळे दिवसागणिक नवीन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. असं असलं तरी त्याचवेळी पुणे शहरातील 25 हजार 809 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बाब नागरिक आणि आरोग्य यंत्रणांसाठीही दिलासादायक आहे. दररोज किमान 500 पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी जात आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

पुण्यात 589 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यात 82 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु आहेत. पुण्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 44 हजार 65 वर पोहचली आहे. यापैकी 17 हजार 53 कोरोना रुग्ण सक्रिय असून उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत पुण्यात एकूण 1 हजार 104 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध होणाऱ्या दैनंदिन अहवालातून ही माहिती स्पष्ट झाली आहे.

हेही वाचा :

‘नगरसेवक हरवले, आता आजारात सोडलं, तसं आम्ही मतदान करताना सोडणार’, पुण्यात युवक काँग्रेसची बॅनरबाजी

Pune Lockdown | पुणेकरांचा लॉकडाऊन संपला, पूर्वीच्या निर्बंधांसह नवे नियम जाहीर

मुंबईसह देशात 3 ठिकाणी अत्याधुनिक लॅब, उद्घाटनासाठी PMO चं उद्धव ठाकरेंना निमंत्रण

Pune Police ride on Cycle for Corona Awareness

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.