Pune Police | पुणेकरांकडून नियमांची पायमल्ली, पोलिसांकडून 4 दिवसात 2,432 कारवाया
पुणे पोलिसांनी चार दिवसात तब्बल 2 हजार 432 कारवाया केल्या. 3 जुलैपासून 7 जुलैपर्यंतची ही कारवाई आहे.
पुणे : पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी (Pune Police Took Action Against Punekar) पोलिसांनी कडक कारवाई सुरु केली. पुणे पोलिसांनी चार दिवसात तब्बल 2 हजार 432 कारवाया केल्या. 3 जुलैपासून 7 जुलैपर्यंतची ही कारवाई आहे. मास्क न घालणारे, विनाकारण भटकणारे आणि नियमांचे उल्लंघनसह ईतर सात प्रकारच्या कारवाया केल्या आहेत (Pune Police Took Action Against Punekar).
मोकाट फिरणारे आणि मास्क न लावणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 31 हजाराच्यावर पोहोचली आहे. तर 900 पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, नागरिकांना गांभीर्य नसल्याने पोलिसांनी कडक कारवाईचे धोरण स्वीकारले आहे.
कुणाकुणावर कारवाई?
मास्क न लावता फिरणाऱ्या 778 मोकाटांवर, विनाकारण भटकणाऱ्या 901 पादचाऱ्यांवर आणि 336 वाहनचालकांवर कारवाई केली गेली आहे. तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 262 वाहनं जप्त करण्यात आली आहेत.
तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक प्रकरणी 107 जणांवर, जास्तवेळ दुकान सुरु ठेवणाऱ्या 45 दुकानदारांवर आणि 3 दुकानदारांवर सोशल डिस्टन्स उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
पुणेकरांकडून निर्बंधांना फाटा, पोलिसांकडून 2 हजार 804 कारवाया, एक हजार 73 वाहने जप्तhttps://t.co/5hvhvdPGaJ#Pune #Lockdown #Corona #PunePolice@PuneCityPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 23, 2020
Pune Police Took Action Against Punekar
संबंधित बातम्या :
Pune Police | पुणेकरांकडून नियमांचं उल्लंघन, पोलिसांकडून एका दिवसात 1 हजार 16 कारवाया