मोठी बातमीः शिवसेनेत लवकरच महिलांचं बंड, ‘या’ बाईमुळे महिला नेत्या अंधारात, मनसेच्या बड्या नेत्याचा दावा

या बाईला काय बोलावं कळत नाही. तिला बोलायला ठेवलंय. भुंकायला नाही. मेंदूला नारू झालाय की काय तिच्या? असा सवाल मनसे नेत्याने केलाय.

मोठी बातमीः शिवसेनेत लवकरच महिलांचं बंड, 'या' बाईमुळे महिला नेत्या अंधारात, मनसेच्या बड्या नेत्याचा दावा
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 1:53 PM

पुणेः शिवसेनेत लवकरच महिलांचं बंड (Rebel in Shivsena party women leaders) होणार असल्याचा मोठा दावा एका बड्या नेत्याने केला आहे. मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांबाबत वक्तव्य केलंय. शिवसेनेत काही दिवसांपूर्वीच आलेल्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्यामुळे, त्यांच्या भाषणांमुळे पक्षातील महिला नेत्यांची कारकीर्द झाकोळली गेल्याची टीका प्रकाश महाजन यांनी केली. या बाईमुळे शिवसेनेच्या इतर महिला नेत्या अंधारात गेल्यात, त्यामुळे उद्धव ठाकरेंना लवकरच महिलांच्या बंडालाही सामोरं जावं लागणार आहे, असा दावा प्रकाश महाजन यांनी केलाय.

सुषमा अंधारे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना प्रकाश महाजन म्हणाले, आम्ही दोघंही बीड जिल्ह्यातले आहोत. या बाईला काय बोलावं कळत नाही. तिला बोलायला ठेवलंय. भुंकायला नाही. मेंदूला नारू झालाय की काय तिच्या?

इतकी वर्ष महापालिकेत सत्ता असून मातोश्रीवर मजला चढला नाही आणि कृष्णकुंजचा विकास झाला… हे बोलण्याआधी तिनं मालकाला विचारलं पाहिजे नं… माझे नेते व्यवसाय करतात. शासनाचे सगळे नियम पाळतात.

सुषमा अंधारेंना प्रकाश महाजन यांनी प्रश्न केला. मातोश्री 2 हे कशावर झालं हे तिनं पाहिलं नाही का, 126 कोटी बापाचे, 11 कोटी मुलाचे कुठून आले? कशाला बोलताय?

ते कसं झालंय. नवीन मुसलमान झाला म्हणजे, दिसेल त्याला आदाब आदाब करत सुटली ती… इथून पुढे एक लक्षात ठेवा, मनसेवर टीका करताल तर… आम्हाला तुमचं सगळच माहिती आहे, असा इशारा प्रकाश महाजन यांनी दिला.

राज ठाकरेंना पुत्रमोह झालाय, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. मात्र सुषमा अंधारेंना तो मोह होऊ शकत नाही, अशी तिची अडचण असल्याचं प्रत्युत्तर प्रकाश महाजन यांनी दिलं.

काही महिन्यांपूर्वी सेनेत पुरुषांचं बंड झालं. आता राहिलेल्या सेनेत बायकांचं बंड होणार आहे. उठ बस ठणाणणा करणारी सेना आहे, त्यात आता बायकांचं बंड होणार आहे. या बाईमुळे ज्या उजेडात बायका होत्या, त्या अंधारात गेल्या आहेत, त्या गप्प बसणार नाहीत, असा इशारा प्रकाश महाजन यांनी दिला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.