पुणे : पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्ण आणि मृत्यूची संख्या (Sasoon Hospital Corona Update) दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्यात दिलासादायक म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. पुण्यात आज (7 मे) दोन वयोवृद्ध आणि एका 25 वर्षीय मातेने कोरोनावर मात केली आहे. हे तिघेही रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने ससून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज या सर्वांना घरी पाठवण्यात आलं. विशेष म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्या मातेच्या बाळाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे तो आईच्या आधीच घरी गेला होता. त्यानंतर आज तब्बल 21 दिवसांनी या आईलाही घरी (Sasoon Hospital Corona Update) सोडण्यात आलं आहे.
ससून रुग्णालयातून आतापर्यंत 11 अत्यवस्थ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, ससून रुग्णालयात आतापर्यंत तीन माता कोरोनामुक्त झाल्या आहेत. तीनही माता पॉझिटिव्ह आढळल्या होत्या, तर त्यांचे बाळ कोरोना निगेटिव्ह होते.
Positive News : पुण्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले, नऊ दिवसात 411 रुग्णांना डिस्चार्ज https://t.co/tzJP047E3V #PuneFightsCovid19 #Pune @mohol_murlidhar
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2020
– पर्वती दर्शन परिसरातील 59 वर्षीय महिला कोरोनामुक्त झाली असून तिला घरी सोडण्यात आलं आहे. या महिलेला कोरोनासह मधुमेह, रक्तदाब आणि हृदयाचा विकार होता. 21 दिवसानंतर या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
– कोंढव्यातील 75 वर्षीय पुरुष रुग्णही कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे त्यालाही घरी सोडण्यात आलं. या रुग्णाला कोरोनासह रक्तदाब हृदयविकार फुप्फुसाचा आजार होता.
– 25 वर्षीय कोरोनाग्रस्त मातेने कोरोनावर मात केली. ससून रुग्णालयात कोरोनाग्रस्त माता कोरोनामुक्त झाली आहे. या महिलेचा चौदाव्या आणि पंधराव्या दिवसाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यांने तिला डिस्चार्ज देण्यात आला. (Sasoon Hospital Corona Update)
आई कोरोना पॉझिटिव्ह तर बाळ निगेटिव्ह
बाळाची आई कोरोना पॉझिटिव्ह, तर बाळ कोरोना निगेटिव्ह होतं. बाळाचा पाचव्या दिवसाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला तेव्हाच रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं. त्यामुळे आई अगोदर बाळ घरी गेलं.
खडकी बाजार इथल्या 25 वर्षीय गरोदर महिलेला 16 एप्रिलला रुग्णालयात दाखल केलं होतं. या महिलेला प्रसूती कळा, ताप, खोकला, घशामध्ये खवखव या त्रासामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं होतं. 17 एप्रिलला या महिलेची प्रसूती झाली आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तर सुदैवाने बाळाची टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यामुळे बाळाला त्याच्या आईपासून दुर ठेवणे भाग होते.
बाळाला ससून रुग्णालयातील ह्युमन मिल्क बँकेकडून दूध पुरवण्यात आलं. बाळाचा पाचव्या दिवसाचा स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर लसीकरण करुन बाळाला डिस्चार्ज देण्यात आला. तर, आईचा चौदाव्या आणि पंधराव्या दिवसाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तिला बुधवारी डिस्चार्ज (Sasoon Hospital Corona Update) देण्यात आला.
संबंधित बातम्या :
राज्य सरकारने पुण्याला वाऱ्यावर सोडलं, भाजप शहराध्यक्षांचा आरोप
महिनाभर अॅम्ब्युलन्सने कोरोना रुग्णांची ने-आण, बर्थडेला आलेल्या पगारातून मास्कवाटप, चालकाचं दातृत्व
Pune Corona Update | पुणे जिल्ह्यात 99 नवे कोरोना रुग्ण, आकडा 2 हजार 300 वर