आधी चार महिन्याच्या बाळाचा कोरोनावर विजय, आता पुण्यात पन्नाशीवरील 7 ज्येष्ठांनी कोरोनाला हरवलं

कोरोनामुक्त झाल्याने या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा जास्त धोका असल्याची चर्चा होती.

आधी चार महिन्याच्या बाळाचा कोरोनावर विजय, आता पुण्यात पन्नाशीवरील 7 ज्येष्ठांनी कोरोनाला हरवलं
Follow us
| Updated on: May 01, 2020 | 12:18 AM
पुणे : पुण्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या (Pune Senior Citizen Fights Corona) प्रमाणावर आहे. पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात एका चार महिन्याच्या बाळाने कोरोनावर नुकतीच मात केली. त्यानंतर आता  ससूनमधील सात ज्येष्ठांनी कोरोनाला चकवा दिला आहे. पन्नशीवरील तीन आणि साठीवरील चार वयोवृद्धांनी (Pune Senior Citizen Fights Corona) कोरोनाला लोळवलं आहे.
कोरोनामुक्त झाल्याने या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा जास्त धोका असल्याची चर्चा होती. मात्र, आता वयोवृद्ध नागरिकांनीही कोरोनावर मात केल्याने अनेकांना दिलासा मिळाला.

हे सात रुग्ण  पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातील आहेत. यामध्ये 50 ते 65 वर्षापर्यंतच्या वृद्धांचा समावेश आहे.
1. येरवड्याच्या 65 वर्षीय रुग्णाला 12 तारखेला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, आता ते वयोवृद्ध रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 28 एप्रिलला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
2. गुलटेकडी येथील 65 वर्षीय रुग्णाला 4 एप्रिलला ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांना रक्तदाबाचा आजार होता. मात्र उपचारानंतर 28 तारखेला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
3. मुकुंदनगर मधील 64 वर्षाच्या रुग्णाला 10 एप्रिलला ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांना किडनीचा आजार होता.  या रुग्णाला 28 तारखेला ससून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं.
4. 60 वर्षीय गंज पेठेतील पुरुषाला पाच तारखेला ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांना मधुमेह रक्तदाब अस्थमाचा आजार होता. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात (Pune Old People Fights Corona) आला.
5. शुक्रवार पेठेतील 55 वर्षीय कोरोना उपचार सुरु होते. त्यांना रक्तदाबाचा त्रास होता. मात्र आता त्यांनी कोरोनावर मात केली असून 28 तारखेला डिस्चार्ज देण्यात आला.
6. पर्वती दर्शन परिसरातील 55 वर्षीय रुग्णाला 15 एप्रिलला ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांना मधुमेह रक्तदाब आणि लठ्ठपणाचा आजार होता. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याने 28 एप्रिलला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
7. दापोडी येथील 50 वर्षीय वयाच्या रुग्णाला नऊ तारखेला ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांनाही रक्तदाबासारखे इतर आजार होते.  मात्र, आता त्यांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज दिला गेला.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 9 हजार 915 वर
महाराष्ट्रात आज (29 एप्रिल) 597 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 9 हजार 915 इतकी झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra). उपचारानंतर बरे झालेल्या 205 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात 1 हजार 593 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 7 हजार 890 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Pune Senior Citizen Fights Corona
संबंधित बातम्या :
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.