Pune Sero Survey | पुण्यात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पाच प्रभागात सिरो सर्व्हे, 51.5 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज

शहरात सर्वाधिक जास्त प्रादुर्भाव असलेल्या पाच प्रभागात हा सर्वे करण्यात आला आहे.

Pune Sero Survey | पुण्यात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पाच प्रभागात सिरो सर्व्हे, 51.5 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज
कोवाक्स आणि गवी (GAVI) लस ही एकत्र करून कोरोनावर लस तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे कोवाक्ससोबत करार करणाऱ्या देशांना नवी लस मिळणार आहे. आतापर्यंत 168 देशांनी कोवाक्ससोबत करार केला आहे. तर चीन, अमेरिका आणि रशिया या देशांचा यामध्ये समावेश नाही.
Follow us
| Updated on: Aug 18, 2020 | 12:40 AM

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सिरो सर्व्हे करण्यात आला आहे (Pune Sero Survey). शहरात सर्वाधिक जास्त प्रादुर्भाव असलेल्या पाच प्रभागात हा सर्वे करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार, तब्बल 51.1 टक्के नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण झाल्याच आढळल आहे. या नागरिकांना कोरोना होऊन ते बरे झाले आहेत (Pune Sero Survey).

या पाचही प्रभागातील 1664 नागरिकांचे नमुने घेण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयआयएसईआर, मनपा सह इतर काही संस्थांच्या वतीने हा सर्वे करण्यात आला. 20 जुलै ते 5 ऑगस्ट या दरम्यान हा सर्वे करण्यात आला. या सर्व्हेनुसार शहराचा विचार केल्यास साधारण 51.5 टक्के नागरिकांना कोरोना होऊन ते बरे झाले आहेत. म्हणजेच शहरातील एवढ्या नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण झाल्या आहेत.

या सिरो सर्व्हेसाठी पुणे शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या पाच प्रभागांची निवड करण्यात आली होती. येरवडा, कसबा आणि सोमवार पेठ, रस्ता पेठ आणि रविवार पेठ, भवानी पेठेतील लोहिया नगर, कासेवाडी आणि नवी पेठ पर्वती प्रभागात सर्वे झाला. या सर्व्हेनुसार विषाणूचा प्रसार हा 36.1 टक्के ते 65. 4 टक्क्यांपर्यंत आढळला (Pune Sero Survey).

त्याचबरोबर स्वतंत्र शौचालय असणाऱ्या घरांमधील 45.3 टक्के तर सार्वजनिक शौचालय असणाऱ्या घरांमध्ये 62.2 टक्के आढळला. बंगल्यामध्ये राहणाऱ्यांमध्ये 43.9% तर चाळ 56 टक्के आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या 62 टक्के नागरिकांमध्ये आढळला.

अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये हे प्रमाण 33 टक्के, स्त्रियांमध्ये 50.1 टक्के आणि पुरुषांमध्ये 52.8 टक्के आहे. मात्र, 66 वयोगटापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांमध्ये प्रसार तुलनेनं कमी 39.8 टक्के आहे.

वया नुसार, 51 ते 65 वयोगटात सर्वाधिक जास्त प्रादुर्भाव दिसून आलं आहे. या गटात 54.8 टक्के, तर 31 ते 50 या गटात 52.1 टक्के, 18 ते 30 वयोगटात 52.5 टक्के तर 66 पेक्षा जास्त वयोगटात 39.8 टक्के नागरिकांना कोरोना होऊन बरा झाला आहे.

या पाच प्रभागांपैकी सर्वाधिक जास्त प्रभाव हा भवानी पेठेतील लोहिना लोहियानगर कासेवाडी प्रभागात आहे. इथ 65.4 टक्के नागरिकांना कोरोना होऊन ते बरे झाले आहेत (Pune Sero Survey).

संबंधित बातम्या :

‘बदल्यांचा बाजार मांडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार’, चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Khadakwasla Dam | पुणेकरांकडून नियमांची पायमल्ली, खडकवासला धरण परिसरात उत्साही नागरिकांची गर्दी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.