पुण्यातील नामांकित विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थिनीचा गळफास
पुण्यात मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गडचिरोली : पुण्यात मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाला (Samidha Raut Suicide) शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत शिकत असलेली समिधा राऊत (Samidha Raut Suicide) ही विद्यार्थिनी काल रात्री गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली.
समिधा ही गडचिरोली येथील मूळ रहिवासी असून हिवताप विभागात कार्यरत कालीदास राऊत यांची कन्या आहे. तर ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत यांची ती पुतणी आहे.
सिम्बॉयसिस गर्ल्स होस्टेल, विमाननगर, पुणे येथील रोहिल मिथील इमारतीच्या खोलीत ती राहत होती. काल रात्री दैनंदिन हजेरीच्या वेळी समिधा उपस्थित न झाल्याने आणि तिच्या खोलीचे (Samidha Raut Suicide) दार बंद असल्याने वसतिगृहाच्या व्यवस्थापनाने बालकनीच्या बाजूला असलेल्या पॅनलमधून खोलीत प्रवेश केला. तेव्हा समिधा खोलीतील पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी तिला खाली उतरविले. त्यानंतर डॉक्टर आणि पोलिसांना पाचारण केले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
समिधाचा मृतदेह आज रात्री गडचिरोलीला आणत असलयाची महिती कुटुंबानी (Samidha Raut Suicide) दिली आहे.