50 हून अधिक घरफोडी करणारे सर्राइत चोरटे जेरबंद, पुणे पोलिसांची मोठी कारवाई
पुणे शहर आणि परिसरात 50 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या दोन सर्राइत चोरट्यांसह एका अल्पवयीनला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे : पुणे शहर आणि परिसरात 50 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या दोन सर्राइत चोरट्यांसह (Pune Thief Arrested) एका अल्पवयीनला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, चांदीच्या विटा आणि पाच चारचाकी गाड्यांसह जवळपास 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे (Pune Thief Arrested).
सनीसिंग पापासिंग दुधानी (वय 19), सोहेल जावेद शेख (वय 19) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन चोरट्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे शहरात घरफोडीच्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली. याच दरम्यान दरोडेखोरांची माहिती काढत असताना पोलिसांना या चोरट्यांची गुप्त माहिती मिळाली.
अटक केलेले चोरटे हे सर्राइत गुन्हेगार असून ते हडपसर परिसरातील म्हाडा कॉलनी येथे थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 50 हून अधिक घरफोड्या केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 29 लाख 55 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यातील बारा घरफोड्या उघड झाल्या असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दीड वर्षांपासून लपाछपीचा खेळ, नागपूर पोलिसांनी वाँटेड आरोपीच्या मुसक्या आवळल्या, 20 लाखांचं चोरी केलेलं सोनं जप्तhttps://t.co/CpXgygHV5z@NagpurPolice #NagpurCrime
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2020
Pune Thief Arrested
संबंधित बातम्या :
भाऊ-बहिणीचा अभ्यासाच्या तणावातून आत्महत्येचा प्रयत्न, बहिणीचा मृत्यू
हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; 50 जणांना अटक, 21 लाखांचा मुद्देमाल जप्त