Pune Undri Murder | कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बेकरी कामगाराला 11 व्या मजल्यावरुन फेकलं
धक्कादायक म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हा प्रताप केलाय. सागर किलवरी असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. (Pune Undri Murder)
पुणे : पुण्याजवळच्या उंड्रीत थरारक हत्याकांड (Pune Undri Murder) उघडकीस आलं आहे. बेकरीत काम करणाऱ्या कामगाराला मारहाण करुन, त्याला थेट इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन फेकण्यात आलं. धक्कादायक म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हा प्रताप केलाय. सागर किलवरी असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. (Pune Undri Murder)
भल्या पहाटे घडलेल्या या थरारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खडी मशीन चौकाजवळील कुल अत्सव सोसायटीत हा थरार घडला. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला.
राज्यभर होळीचा उत्साह असताना, इकडे पुण्यात हे हत्याकांड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कामगाराला मारहाण करुन त्याला अकराव्या मजल्यावरुन फेकल्याने, आरोपींच्या क्रूरतेची कल्पना येऊ शकते. गुन्हा करणारे आरोपी हे कॉलेजचे विद्यार्थी असल्याने या घटनेचीच परिसरात चर्चा आहे.
दरम्यान, ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली, त्याचा तपास पोलीस करत आहेत.