सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचे संकेत, कुलगुरुंची प्राचार्यांसोबत बैठक
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Pune university exam) आहे.

पुणे : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Pune university exam) आहे. या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक गोष्टी सोडल्यास बाकी सर्व बंद करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. त्यामुळे शाळा आणि कॉलेजमधील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण आता लॉकडाऊनचा काळ वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी घ्यायच्या यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु यांनी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालक आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांसोबत बैठक घेतली आहे. तसेच या बैठकीतील अहवाल आज किंवा उद्या (Pune university exam)सरकारला सादर करणार आहेत.
कुलगुरुंनी महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थांचे संचालक आणि अभ्यास मंडळांच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन परीक्षांच्या नियोजनाबाबत सूचना दिल्या आहेत. यावेळी लॉकडाऊनबाबत विविध शक्यता गृहित धरुन नियोजन करण्याच्या सूचनाही कुलगुरुंनी दिल्या आहेत.
लॉकडाऊन येत्या 14 एप्रिलला संपणार की वाढवणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसल्याने परीक्षा कधी घ्यायच्या, कशा पद्धतीने घ्यायच्या याबाबत सर्वच विद्यापीठांपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. त्यासोबत विद्यापीठाच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे कुलगुरुंनी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थाचालक आणि अभ्यास मंडळातील सदस्यांसोबत घेतलेल्या बैठकीत परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबतही चर्चा केली. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑलाईनही होऊ शकतात, असं म्हटलं जात आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत देशात 6 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात दीड हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.