Corona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना दक्षतेबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या (Corona Virus Pune University) आहेत.

Corona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना
Follow us
| Updated on: May 29, 2020 | 8:12 AM

पुणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना दक्षतेबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या (Corona Virus Pune University) आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी हे परिपत्रक काढले आहे.

विद्यापीठात फेस मास्क परिधान करणे बंधनकारक (Corona Virus Pune University) आहे. फेस मास्क नसलेल्या व्यक्तींना कार्यालयात प्रवेश करण्यास मनाई घालण्यात आली आहे. तसेच विभागातील सर्व खोल्यांमधील दारे आणि खिडक्‍या उघड्या करून ठेवाव्यात आणि पंखे सुरू ठेवावेत असं परिपत्रकात म्हटले आहे.

स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी पाणी आणि साबण उपलब्ध असणे आवश्‍यक राहील. तसेच कार्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी वारंवार आपले हात साबण-पाण्याने स्वच्छ धुवावेत अथवा सॅनिटायझर वापरावे, अशाही सूचना दिल्या आहेत.

कार्यालयामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध असावे. कार्यालयामध्ये प्रत्येक ठिकाणी पिशव्या घालून पायाने झाकण उघडणाऱ्या कचऱ्याचे डब्बे ठेवावेत. विद्यापीठातील प्रत्येक कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयी चौकशी करण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांना ताप, घसा दुखणे, खोकला किंवा कोरडा खोकला असल्यास ताबडतोब आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवावे. तसेच कार्यालयातील कोणी परगावावरून आले असल्यास त्यांना आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठविण्यात यावे आणि त्यांना 14 दिवस घरी राहण्याबाबत सांगणे, अनावश्‍यक प्रवास टाळण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या :

पुणे तिसऱ्या क्रमांकावर, कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्रातील 10 महापालिका कोणत्या?

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,598 रुग्णांची भर, आकडा 59,546 वर

Kolhapur Corona | कोल्हापुरात आतापर्यंत 1 लाख नागरिकांचा प्रवेश, सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातून?

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.