पुणे विद्यापीठात ऑफलाईन परीक्षेचा खोळंबा, प्रश्नपत्रिकांच्या प्रिंटसाठी ‘ओटीपी’च मिळाला नाही

पुणे विद्यापीठात पहिल्याच दिवशी ऑफलाईन परीक्षेचा खोळंबा झालेला पाहायला मिळाला.(Pune University Offline Exam Delay due to OTP Issue)

पुणे विद्यापीठात ऑफलाईन परीक्षेचा खोळंबा, प्रश्नपत्रिकांच्या प्रिंटसाठी 'ओटीपी'च मिळाला नाही
पुणे विद्यापीठ
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 3:49 PM

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेला आजपासून (12 ऑक्टोबर) सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी ऑफलाईन परीक्षेचा खोळंबा झालेला पाहायला मिळाला. पुणे विद्यापीठाकडून ऑनलाईन पाठवल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांची प्रिंट करण्यासाठी आवश्यक असणारा ‘ओटीपी’ आला नाही. त्यामुळे पहिल्या सत्रातील ऑफलाईन परीक्षा ठप्प झाली आहे. (Pune University Offline Exam Delay due to OTP Issue)

पुणे विद्यापीठात अंतिम वर्षांच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली. या परीक्षेचा पेपरचा वेळ सकाळी 10 वाजता होता. मात्र तो दुपारी 12 ला सुरु झाला. त्यामुळे इतर दिवसभराच्या वेळापत्रकावर याचा परिणाम पाहायला मिळत आहे.

पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात 34, अहमदनगर जिल्ह्यात 34 आणि नाशिक जिल्ह्यात 45 अशा एकूण 113 महाविद्यालयांमध्ये व्यवस्था केली आहे. जवळपास 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत.

सोमवारी सकाळी दहा वाजता ऑफलाईन परीक्षेचे पहिले सत्र सुरू होणार होते. त्यासाठी संबंधित परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यात आले. पंधरा-वीस मिनिटानंतरही प्रश्नपत्रिकांचे आणि ओएमआर उत्तरपत्रिकांचे वाटप झाले नाही.

त्यामुळे विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना पेपर कधी मिळणार याची चौकशी सुरू झाली. त्यावेळी विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिका आली नाही. त्यामुळे थोडासा वेळ लागत आहे असे सांगण्यात आले. मात्र, साडे अकराच्या सुमारास ओटीपी आल्यानंतर प्रश्नपत्रिकांची प्रिंट काढून बाराच्या सुमारास पहिल्या सत्रातील पेपर सुरू झाला. दरम्यान प्रत्येक सेंटरवर एका सत्रामध्ये साधारणपणे दोनशे विद्यार्थी परीक्षा देत आहेत.(Pune University Offline Exam Delay due to OTP Issue)

संबंधित बातम्या : 

अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा, 5 टक्के सवलत जाहीर

मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घाईघाईत घेणार नाही; मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा मंत्र!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.