Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जगातील टॉप 100 संस्थांमध्ये समावेश

लंडन : यावर्षीच्या टाइम्स हायर एज्युकेशन म्हणजेच टीएचईच्या प्रतिष्ठित ‘Higher Education Emerging Economies ranking’ मध्ये भारतातल्या 49 शैक्षणिक संस्थांचा समावेश झालाय. यापैकी 25 संस्था टॉप 200 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्या आहेत. लंडनमधील टाइम्स हायर एज्युकेशनच्या आकडेवारीनुसार, चीनच्या सर्वात जास्त संस्था या यादीत आहेत. चीनच्या शिंगुआ विद्यापीठाने पहिला क्रमांक मिळवलाय, तर पहिल्या पाचमध्ये चीनच्या चार […]

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जगातील टॉप 100 संस्थांमध्ये समावेश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

लंडन : यावर्षीच्या टाइम्स हायर एज्युकेशन म्हणजेच टीएचईच्या प्रतिष्ठित ‘Higher Education Emerging Economies ranking’ मध्ये भारतातल्या 49 शैक्षणिक संस्थांचा समावेश झालाय. यापैकी 25 संस्था टॉप 200 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्या आहेत. लंडनमधील टाइम्स हायर एज्युकेशनच्या आकडेवारीनुसार, चीनच्या सर्वात जास्त संस्था या यादीत आहेत. चीनच्या शिंगुआ विद्यापीठाने पहिला क्रमांक मिळवलाय, तर पहिल्या पाचमध्ये चीनच्या चार संस्था आहेत.

जागतिक संस्थांसाठी टीएचईची आकडेवारी प्रतिष्ठीत मानली जाते. उच्च शिक्षणाची माहिती जमा करणे, त्याचं विश्लेषण करणे आणि त्यावर संशोधन करणारी ही एक जागतिक संघटना आहे. या संस्थेकडून दरवर्षी विविध संस्थांच्या त्यांच्या दर्जावर आधारित रँकिंग जारी केल्या जातात.

टीएचईच्या या यादीत भारतीय विज्ञान संस्थेने (IISc) 14 वा क्रमांक मिळवलाय. तर आयआयटी बॉम्बेचा 27 वा क्रमांक आहे. दोन्हीही संस्थांची रँकिंग गेल्या वर्षीच्या तुलनेत एका आकड्याने घसरली आहे. त्यामुळे या उच्च शिक्षणात कुठे तरी कमी पडल्याचं चित्र आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पहिल्या 100 मध्ये 93 व्या क्रमांकावर आहे.

चार खंडांमधील 450 संस्थांचा समावेश

टीएचईच्या यादीत चार खंडांमधील 43 देशांच्या 450 संस्थांचा समावेश आहे. गेल्या वर्षी 378 संस्थांचा समावेश होता. यावर्षी भारतासाठी संमिश्र चित्र आहे. वेगाने प्रगती करत असलेल्या काही संस्थांचा यामध्ये समावेश झालाय, तर काही संस्थांचं स्थान गेल्या वर्षीच्या तुलनेत बदललं आहे. टॉप 200 मध्ये भारताच्या 25 संस्था असल्याचं टीएचईने सांगितलंय.

भारतीय संस्थांची कामगिरी

आयआयटी रुरकीने मोठी झेप घेत टॉप 40 मध्य प्रवेश मिळवलाय. आयआयटी रुरकीचा सध्या 35 वा क्रमांक आहे. भारताकडून या यादीत नव्याने प्रवेश मिळवणाऱ्या आयआयटी इंदूरने 61 वं स्थान मिळवलंय. तर जेएसएस अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चने संयुक्तपणे 64 वं स्थान मिळवलंय.

बनारस हिंदू विद्यापीठ आणि अमृता विद्यापीठाने यावर्षी टॉप 150 संस्थांच्या यादीत प्रवेश मिळवलाय. तर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थान, पुणे आणि आयआयटी हैदराबादला या यादीत पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलंय.

या यादीत सर्वाधिक प्रवेश मिळणाऱ्या चीनच्या 72 संस्था आहेत. टीएचईच्या मते, भारतीय संस्थांकडे प्रगतीची मोठी संधी आहे. या संस्थांनी केवळ प्रगतीच केलेली नाही, तर जागतिक स्तरावरही नाव मोठं केलंय, असं निरीक्षण टीएचईकडून नोंदवण्यात आलंय. त्यामुळे भारतीय शिक्षण क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

भारतातील महत्त्वाच्या रँकिंग

भारतीय विज्ञान संस्था 14

आयआयटी बॉम्बे 27

आयआयटी रुरकी 35

आयआयटी कानपूर 46

आयआयटी खरगपूर 55

आयआयटी इंदूर 61

जेएसएस अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च 64

आयआयटी दिल्ली 66

आयआयटी मद्रास 75

सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे 93

इंडियन इन्स्ट्यिट्युट ऑफ सायन्स अँड रिसर्च 109

तेजपूर विद्यालय 109

दिल्ली विद्यापीठ 127

जाधवपूर विद्यापीठ 130

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.