Pune Wall Collapse : आरोपी बिल्डरांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टात काय घडलं?

पुण्यातील कोंढवा भागात काल (29 जून) मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन बिल्डरांना न्यायलयाने 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Pune Wall Collapse : आरोपी बिल्डरांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टात काय घडलं?
Follow us
| Updated on: Jun 30, 2019 | 5:27 PM

पुणे : पुण्यातील कोंढवा भागात काल (29 जून) मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 मजुर तर तीन मुलांचा समावेश आहे. कोंढव्यातील तालाब मशीदीजवळील कंपनीसमोर ही दुर्घटना घडली. दरम्यान या प्रकरणी पुणे पोलिसांनी 8 जणांपैकी विपुल अग्रवाल आणि विवेक अग्रवाल या दोघांना अटक केली होती. याप्रकरणी या दोघांना न्यायलयाने 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, या दुर्घटनेतील 15 जणांचे मृतदेह विमानाने बिहारला पाठवण्यात आले.

दरम्यान काल (29 जून) मध्यरात्रीच्या दीड दोनच्या सुमारास बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या मजुरांना राहण्यासाठी पत्र्याचे शेड उभे केले होते. या शेडवर इमारतीची भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. भिंत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं आणि अडकलेल्या काहींना वाचवलं. त्यानंतर त्यातील काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

यानंतर पुणे पोलिसांना काल संध्याकाळच्या सुमारास आल्कन स्टायलस लॅंडमार्कस या बांधकाम संस्थेच्या पाच भागीदारांपैकी दोघांना अटक केली. विपुल अग्रवाल आणि विवेक अग्रवाल अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी या दोघांना आज पुणे जिल्हा न्यायलयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायलयाने 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोर्टात काय घडलं? 

पुण्यात काल इमारतीची भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 15 मजुरांना आपला जीव गमवावा लागला असून दोन मजुर गंभीर जखमी आहे. हा गंभीर गुन्हा आहे. आरोपींनी ही भिंत 2013 मध्ये बांधली होती. मात्र ती मोडकळीस आल्याने अल्कॉन सोसायटीच्या सदस्यांनी आरोपी आणि भागीदार यांना पत्रव्यवहार करत याकडे लवकरात लवकर कार्यवाही करावे असे सांगितले होते. मात्र याबाबत वेळीच कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ही कार्यवाही का झाली नाही याबाबत पोलिसांना तपास करायचा आहे. तसेच आरोपींकडून इमारतीचा बांधकाम नकाशा, परवानगी यासारख्या इतर गोष्टी प्राप्त करायच्या आहेत, असे पोलिसांनी न्यायलयाला सांगितले.

विशेष म्हणजे या भिंतीचा ठेका आरोपींनी कोणाला दिला होता, याबाबतही तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. तसेच ही भिंत अधिकृत होती की अनधिकृत याबाबतही पोलिसांना आरोपींनी माहिती दिलेली नाही. तसेच अटक झालेल्या बिल्डरांना इतर आरोपींबाबत माहिती आहे. मात्र ते पत्ता सांगण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे त्या दोघांच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी दहा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र न्यायलयाने या दोघांना 2 दिवसांची म्हणजेच 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अद्याप इतर बिल्डर फरार

या घटनेप्रकरणी पुणे पोलिसांनी काल (29 जून) दोन्ही बाजूच्या बिल्डरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. त्यात आल्कन स्टायलस लॅंडमार्कस या बांधकाम संस्थेच्या पाच भागीदार बिल्डर आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जगदीशप्रसाद अग्रवाल (64), सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल (34), राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल (27), विवेक सुनिल अग्रवाल (21), विपूल सुनील अग्रवाल (21) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. तसेच या बिल्डरचे साईट इंजिनिअर, सुपरवाईजर, कंत्राटदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याशिवाय कांचन डेव्हलपर्स या बांधकाम संस्थेच्या तीन भागीदार बिल्डरांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी अशी गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरांची नावे आहेत. तसेच याप्रकरणी या बिल्डरचे साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर आणि मजुर पुरवणारा कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या दुर्घटनेत मृत्यू झालेले मजूर हे कांचन डेव्हलपर्स यांच्याच बांधकाम प्रकल्पावर काम करत होते. दरम्यान आतापर्यंत आल्कन स्टायलस लॅंडमार्कस या बांधकाम संस्थेच्या दोन बिल्डरांना अटक करण्यात आली असून इतर आरोपी बिल्डर फरार आहेत.

संबंधित बातम्या : 

Pune Wall Collapse : 8 बिल्डरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Pune Wall Collapse : मृतांच्या नातेवाईकांना 9 लाख, मृतदेह विमानाने बिहारला पाठवणार

Pune Wall Collapse: नेमकं काय घडलं?

पुण्यात भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.