पुण्याची रुग्णसंख्या दोन हजाराच्या उंबरठ्यावर, भवानी पेठेत 27 नवे कोरोनाग्रस्त, कोणत्या प्रभागात किती?
भवानी पेठेत तब्बल 352 रुग्ण आहेत. ढोले पाटील रोडला 267, तर शिवाजीनगर घोले रोडला एकूण 237 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. (Pune Ward wise Covid19 Patients)
पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजाराच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. एका रात्रीत तब्बल 68 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या 1 हजार 980 वर गेली आहे. भवानी पेठेतील रुग्णसंख्येने साडेतीनशेचा टप्पा ओलांडला आहे. (Pune Ward wise Covid19 Patients)
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 103 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. भवानी पेठेत 27 नवे कोरोनाग्रस्त आढळल्याने आकडा 352 वर गेला आहे. याशिवाय, दोन वॉर्डमध्ये प्रत्येकी दोनशेपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत, तर दोन वॉर्डमध्ये रुग्णसंख्येने प्रत्येकी दीडशेचा टप्पा ओलांडला आहे.
पुणे शहरात 2 मेपर्यंत 1730 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णांपैकी 1694 रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
भवानी पेठेत तब्बल 352 रुग्ण आहेत. ढोले पाटील रोडला 267, तर शिवाजीनगर घोले रोडला एकूण 237 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर सर्वात कमी म्हणजे तीन रुग्ण कोथरुड बावधनमध्ये आहेत.
भवानी पेठ (27 नवे रुग्ण), ढोले पाटील रोड (21), शिवाजीनगर- घोलेरोड (10), येरवडा- धानोरी (10) या भागात कालच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर नवे रुग्ण सापडले.
वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ)
औंध – बाणेर – 4 (0) कोथरुड – बावधन – 3 (0) वारजे – कर्वेनगर – 9 (0) सिंहगड रोड – 12 (+1) शिवाजीनगर – घोलेरोड – 237 (+10) कसबा – विश्रामबाग वाडा – 156 (+5) धनकवडी – सहकारनगर – 121 (0) भवानी पेठ – 352 (+27) (Pune Ward wise Covid19 Patients) बिबवेवाडी – 64 (+9) ढोले पाटील रोड – 267 (+21) कोंढवा – येवलेवाडी – 29 (+1) येरवडा – धानोरी – 182 (+10) नगर रोड – वडगाव शेरी – 48 (+6) वानवडी – रामटेकडी – 90 (0) हडपसर – मुंढवा – 55 (+1) पुण्याबाहेरील – 64 (0)
पुण्यात 5500, तर नागपुरात 9500 हजार नागरिकांचे घरी जाण्यासाठी अर्ज, वैद्यकीय तपासणीनंतर परवानगीhttps://t.co/jfAu7a5LZL #Covid_19india #Pune #nagpur
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 3, 2020
(Pune Ward wise Covid19 Patients)