Pune Wedding | पुण्यात हॉटेलमध्ये 250 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न, 25 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू, हॉटेलला नोटीस
लॉकडाऊनच्या सर्व नियमांची पायमल्ली करत तब्बल 250 वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला.
पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबता थांबत नाही (Pune Wedding Ceremony). तरी, पुणेकर अद्यापही बेफिकीर सारखे वागताना दिसत आहेत. पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक लग्न सोहळा पार पडला. फक्त 50 जणांची परवानगी असतानाही लॉकडाऊनच्या सर्व नियमांची पायमल्ली करत तब्बल 250 वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Pune Wedding Ceremony).
धक्कादायक बाब म्हणजे, या लग्न सोहळ्याला उपस्थित असलेल्यांपैकी 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोघांचा कोरोनानमुळे मृत्यू झाला आहे. 30 जूनला हा लग्न सोहळा पार पडला.
लॉकडाऊन काळात हॉटेलमध्ये लग्न सोहळा करणे या हॉटेलला चांगलच महागात पडलं आहे. लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या पंचतारांकित हॉटेलला नोटीस पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Pune Wedding Ceremony).
पुण्यातील नगररोडवरील हयात रिजन्सी या पंचतारांकित हॉटेलला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. या लग्नात तब्बल 250 वऱ्हाडी उपस्थित होते. लग्न सोहळ्याला उपस्थित 25 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर उपस्थितांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर कपिल राजेश गर्ग, विशाल उमेशचंद्र तिवारी यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.
नवरा-नवरीला कोरोना, एका लग्नामुळे 7 ठिकाणी कंटेन्मेंट झोन, नवरदेवाला 25 हजाराचा दंडhttps://t.co/N0A7TxAOFM
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 14, 2020
Pune Wedding Ceremony
संबंधित बातम्या :
लग्नानंतर 15 दिवसातच नववधू प्रियकरासोबत पसार, दीड लाखांच्या दागिन्यांसह पोबारा
पुण्यात अनोखं लग्न, मुलाचे वडील देहरादूनमध्ये, मुलीचे वडील नागपुरात, पोलिसांकडून कन्यादान