पुण्यात ‘शरद भोजन’ सुरु, ‘कोरोना विषाणू’ संसर्ग काळात योजना

निराधार दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, दुर्धर आजार असणारे निराधार व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांना दोन वेळचे अन्न पुरवण्यासाठी 'शरद भोजन योजना' सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे (Pune ZP Sharad Bhojan during Corona outbreak)

पुण्यात 'शरद भोजन' सुरु, 'कोरोना विषाणू' संसर्ग काळात योजना
Follow us
| Updated on: Apr 02, 2020 | 4:12 PM

पुणे : ‘कोरोना विषाणू’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद निराधार दिव्यांग व्यक्तींच्या मदतीला धावून आली आहे. विषाणू संसर्गाच्या काळात पुणे जिल्ह्यात ‘शरद भोजन योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन या संदर्भात माहिती दिली. (Pune ZP Sharad Bhojan during Corona outbreak)

निराधार दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, दुर्धर आजार असणारे निराधार व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांना दोन वेळचे अन्न पुरवण्यासाठी ‘शरद भोजन योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. ज्या दिव्यांग, आजारी किंवा वयोवृद्ध व्यक्तींच्या घरी जेवण तयार करणारं कोणी नाही, त्यांना या योजनेचा लाभ होईल.

राज्य सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’च्या धर्तीवर ही योजना असल्याचे पुणे महापालिकेने स्पष्ट केलं आहे. या योजनेमध्ये निराधार दिव्यांग व्यक्तीच्या गावातील अंगणवाडी सेविका त्यांना दररोज दोन वेळचे जेवण तयार करुन देईल. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींचं पोषण आणि अंगणवाडी सेविकांचा आर्थिक प्रश्न अशा दुहेरी समस्या सुटणार आहेत.

हेही वाचा : श्रीमंत गेले फार्महाऊसवर, पण गरिबांच्या घरात बसायला जागा नाही, त्यामुळे ते रस्त्यावर : आव्हाड

ग्रामपंचायतीमधील अंगणवाडी मदतनीस यांच्यामार्फत जेवणाची व्यवस्था करणे आणि अन्न पुरवठा करणे यासाठी व्यक्तीनिहाय 50 रुपये असा थाळीचा दर ठरवण्यात आला आहे.

अंगणवाडी मदतनीस यांच्या वैयक्तिक खात्यावर 50 रुपयेप्रमाणे दोन वेळचे 100 रुपये अनुदान जमा करण्यात येणार आहे. परंतु निराधार दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, दुर्धर आजार असणारे निराधार व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरीक यांना प्रतिथाळी किती रुपये मोजावे लागणार, की मोफत पुरवठा होणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. (Pune ZP Sharad Bhojan during Corona outbreak)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.